Rabi Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : खानदेशात रब्बीची पेरणी अंतिम टप्प्यात

Rabi Season : जळगावात हरभऱ्याची सर्वाधिक सुमारे एक लाख हेक्टरवर पेरणी झाली असून, जिल्ह्यात सुमारे ९० टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात रब्बी हंगामातील प्रमुख पिकांची पेरणी आटोपली आहे. पेरणी सरासरी क्षेत्रापेक्षा किंचित कमी होऊ शकते. जळगावात हरभऱ्याची सर्वाधिक सुमारे एक लाख हेक्टरवर पेरणी झाली असून, जिल्ह्यात सुमारे ९० टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र पावणोदन लाख हेक्टर आहे. तर पेरणी एक लाख ७० हजार हेक्टरपर्यंत झाल्याचा अंदाज आहे. पेरणी गेल्या आठवड्यातच ८० टक्क्यांवर झाली होती. खानदेशात सुमारे पावणेचार लाख हेक्टरवर रब्बी पेरणीची अपेक्षा आहे. धुळ्यातील रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ६० हजार हेक्टर तर नंदुरबारात सुमारे ४२ हजार हेक्टर एवढे क्षेत्र आहे.

या दोन्ही जिल्ह्यांतही पेरणी कमी दिसत आहे. कारण यंदा पाऊस कमी होता. जळगाव जिल्ह्यात गिरणा धरणातून रब्बीसाठी पाणी मिळणार नसल्याने गिरणा पट्ट्यात रब्बी हंगाम जेमतेम आहे. खानदेशात रब्बीची पेरणी एकूण दोन लाख ३० हजार हेक्टरवर झाल्याचा अंदाज आहे. त्यात सर्वाधिक हरभरा आहे.

यापाठोपाठ दादर ज्वारी व संकरित ज्वारी, मका, गहू यांची पेरणी झाली आहे. हरभरा, गहू, ज्वारीची पेरणी आटोपली आहे. सध्या फक्त संकरित ज्वारी, बाजरी, मका, कांदा यांची लागवड सुरू आहे. मक्याची लागवडही या आठवड्यात पूर्ण होईल.

खानदेशात मक्याची सुमारे ५५ हजार हेक्टरवर लागवड अपेक्षित आहे. ज्वारीची पेरणी सुमारे ३५ हजार हेक्टरवर झाल्याची माहिती आहे. गव्हाची पेरणीदेखील १८ हजार हेक्टरपर्यंत झाली आहे.

कांदा लागवड कमी होईल, अशी स्थिती आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार हेक्टरवर, धुळ्यात तीन हजार हेक्टरवर तर नंदुरबारात सुमारे एक हजार हेक्टरवर कांदा लागवड अपेक्षित आहे. बाजरीची पेरणी जानेवारीच्या मध्यापर्यंत सुरू राहील. बाजरीची पेरणीदेखील सुमारे सहा हजार हेक्टरपर्यंत होईल, असे सांगण्यात आले.

धुळ्यात अनेर, पांझरा प्रकल्पातून रब्बीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातही मध्यंतरी हतनूर धरणातून पाणी सोडले होते. तसेच वाघूर प्रकल्पातूनही लवकरच पाणी सोडले जाईल, असे संकेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT