Rabi Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : रब्बी पेरणी क्षेत्र निम्म्याने झाले कमी

Rabi Season : भूम तालुक्यामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा निम्म्यानेच रब्बीच्या पेरणी क्षेत्रामध्ये घट झालेली दिसून येत आहे. दरवर्षी तालुक्यामध्ये एकूण ४४५८२.५८ हेक्टर एवढे क्षेत्र असते.

Team Agrowon

Latest Agriculture News : भूम तालुक्यामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा निम्म्यानेच रब्बीच्या पेरणी क्षेत्रामध्ये घट झालेली दिसून येत आहे. दरवर्षी तालुक्यामध्ये एकूण ४४५८२.५८ हेक्टर एवढे क्षेत्र असते. परंतु, यावर्षी पाऊस न पडल्यामुळे रब्बीचे क्षेत्र निम्म्याने घटून २१२४९ हेक्टर पेरणी झाल्याचे कृषी कार्यालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार दिसत आहे.

तालुक्यामध्ये अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे सोयाबीन काढणीनंतर शेतकऱ्यांनी त्वरीत उपलब्ध ओलाव्यावर रब्बी पेरण्या उरकून घेतल्या. त्यामुळे काही ठिकाणी ज्वारी उगवण झालेली आहे तर काही ठिकाणी उगवण न झाल्याचे चित्र आहे.

पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी शेत भिजवून नंतर पेरणीची कामे केली आहेत. त्यामुळे या लागवडीपासून थोड्याप्रमाणात तरी उत्पादन मिळण्याची शेतकऱ्यांना आशा वाटत आहे.

दरवर्षी भूम तालुक्यामध्ये ज्वारी क्षेत्र बऱ्यापैकी जास्त असते. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न जाणवत नाही. मात्र यावर्षी पेरणीच अत्यल्प प्रमाणात झाल्यामुळे पुढील काळात चाऱ्याचा प्रश्न बिकट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

मी दरवर्षी पाच एकर क्षेत्रावर ज्वारी लागवड करतो. परंतु, यावर्षी पाऊस न पडल्यामुळे दोनच एकर ज्वारी पेरणी केली आहे. आम्ही दरवर्षी ज्वारीला तीन पाणी देतो. परंतु, यावर्षी पाण्याची कमतरता असल्यामुळे उत्पादनामध्ये घट होणार आहे.
- अमोल माळी, शेतकरी भूम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT