Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : पुणे जिल्ह्यात ‘रब्बी’च्या पेरण्या खोळंबल्या

Rabi Season in Pune : चालू वर्षी पुरेसा पाऊस न पडल्याने रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या असून, तर जिथे पेरण्या सुरू आहेत त्या धिम्या गतीने सुरू आहेत.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : चालू वर्षी पुरेसा पाऊस न पडल्याने रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या असून, तर जिथे पेरण्या सुरू आहेत त्या धिम्या गतीने सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात रब्बीच्या सरासरीच्या दोन लाख २९ हजार ७१२ हेक्टरपैकी ८७ हजार ८३ हेक्टरवर म्हणजेच अवघी ३८ टक्के पेरणी झाली आहे. काही प्रमाणात थंडी वाढल्याने पेरण्या वाढण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांनी कमी पाण्याच्या पिकांवर भर दिला आहे. त्यामुळे रब्बी ज्वारीच्या सरासरीच्या एक लाख ३४ हजार ३३६ हेक्टरपैकी ६८ हजार ३९२ हेक्टर म्हणजेच ५१ टक्के पेरणी झाली आहे. त्यानंतर हरभरा पिकांच्या पेरणीवर शेतकऱ्यांनी भर देण्यास सुरुवात केली आहे.

हरभऱ्याची सरासरीच्या ३४ हजार ३३० हेक्टरपैकी ४ हजार ४७६ हेक्टर म्हणजेच १३ टक्के पेरणी झाली आहे. आता गहू, मका, करडई, जवस या पिकांच्या पेरण्यांना बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे. सध्या खरीप हंगामातील भात पीक दाणे पक्वतेच्या अवस्थेत असून काही ठिकाणी भातपिकाची काढणी सुरू झाली आहे.

बाजरी पिकाची ९८ टक्के क्षेत्रावरील काढणी पूर्ण झाली असून पावसाच्या खंडामुळे उत्पादकतेत ६० ते ७० टक्के घट येत आहे. सोयाबीन पिकाची ८५ टक्के क्षेत्रावरील काढणी पूर्ण झाली असून अपुरा पाऊस व पावसातील खंड यामुळे ५० ते ६० टक्के घट आली आहे.

मका पिकाची काढणी सुरू असून ७५ टक्के क्षेत्रावरील काढणी पूर्ण झालेली आहे. भुईमूग पिकाची ८५ टक्के क्षेत्रावरील काढणी पूर्ण झाली असून उत्पादकतेत ५५ ते ६० टक्के घट येण्याची शक्यता आहे. खरीप पिकांची काढणी सुरू असल्याने रब्बी हंगामाच्या पिकांची पेरणी लांबली आहे. रब्बी ज्वारी, मका पिकांच्या पेरणी झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage: एका दिवसात ८४६८ हेक्टरला फटका

Ahilyanagar Crop Damage: अहिल्यानगरमध्ये पूर्वमोसमी पावसाचा पिकांना फटका

Food Processing License: अन्नप्रक्रिया परवाना नूतनीकरणाची अट रद्द

Revenue Department: शासकीय तिजोरीत ६१ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा

Lemon Price Drop: ऐन उन्हाळ्यात लिंबांच्या दरात घसरण

SCROLL FOR NEXT