Crop Insurance Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Scheme : संभाजीनगरनंतर अकोल्यात शेतकऱ्यांची विमा कंपन्यांकडून थट्टा

Aslam Abdul Shanedivan

Pune News : रब्बी हंगामात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई मिळेल, असा आशावाद अनेक शेतकऱ्यांना होता. मात्र राज्यातील शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झाला आहे. गेल्या महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची विमा कंपन्यांकडून थट्टा झाली होती. असाच प्रकार आता आकोला जिल्ह्यात देखील उघड झाला आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता.५) ठिय्या आंदोलन केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले. तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

गेल्या महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर केवळ ७० ते ७५ रूपये नुकसान भरपाई पडली होती. दरम्यान आधीच नैसर्गिक आपत्ती त्यात शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी अचडचणीत आला आहे. यादरम्यान विमा कंपन्यांनी ७० ते ७५ रूपये देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. विम्याच्या ७० रूपयांसाठी बँक खात्यात एक हजार रूपये बॅलन्स भरावा लागणार आहे. त्यामुळे एक हजार रूपये भरायचे कोठून असा सवाल जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला. तर राज्य सरकारसह विमा कंपन्यांचा निषेध नोंदवला होता.

यानंतर आता अकोला जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची योग्य रक्कम आलेली नाही. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यात आले. ४० ते ५० टक्के नुकसान झाल्याची नोंद देखील घेण्यात आली. पण आता शेतकऱ्यांच्या खात्यावर तटपंजी रक्कम विमा कंपन्यांनी जमा केली आहे.

अकोल्यातील म्हैसांग येथील शेतकरी आकाश पिंप्रे यांनी २ एकरात हरभरा लावला होता. मात्र फेब्रुवारी महिन्यात पडलेल्या पावसाने पिकाची नासाडी केली. त्यावेळी पिंप्रे यांनी याची माहिती विमा कंपनी व कृषी कार्यालयाला दिली. त्याप्रमाणे विमा कंपनीने नुकसानीचा पंचनामा करताना ४५ टक्के नुकसान झाल्याची नोंद घेतली होती. या नोंदीप्रमाणे पिंप्रे यांना ३० हजार नुकसान भरपाई मिळेल असा अंदाज होता. मात्र त्यांच्या खात्यावर फक्त १८९ रूपये जमा झाल्याचा मॅसेज आला.

विमा कंपनीकडून फक्त पिंप्रे यांचीच थट्टा करण्यात आलेली नसून मूर्तिजापूर तालुक्यातील अनेक शेतकरी देखील यात आहेत. यातील एक शेतकरी राजुरा गावातील रियाजुद्दीन सय्यद आहेत. सय्यद यांनी देखील दोन एकरावर हरभरा पेरला होता. मात्र त्यांचे देखील पावसाने नुकसान केले. सय्यद यांच्या पंचनाम्यानुसार विमा कंपनीने २३ हजारांची रक्कम मिळेल असे म्हटले होते. पण त्यांनी फक्त ५८३ रूपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

दरम्यान, विमा कंपन्यांच्या थट्टा करणाऱ्या रक्कमेमुळे जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाला आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यावरून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात रब्बी हंगामात हरभरा, गहू पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्याबाबत शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रारी केल्या. त्याप्रमाणे पंचनामे देखील करण्यात आले. मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक विमा कंपनीच्या प्रतिनीधींनी योग्य पंचनामा केला नाही, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

तसेच पंचनाम्यात भरलेली रक्कम मिळाली नसल्याने विमा कंपनी आणि सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचा आरोप गवळी यांनी केला आहे. तसेच शेतकऱ्यांना सरकारी मदतीची गरज नसून त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे हवे आहेत. सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे न दिल्यास सरकारला धडा शिकवू असा इशारा गवळी यांनी दिला आहे.

विमा कंपन्यांनी नुकसान भरपाईची जी रक्कम दिली आहे. ती तुटपुंजी असून विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी. कोणतेही नियम आणि निकष न लावता २५ ते ३० हजार नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

तसेच अनेक शेतकऱ्यांनी तक्रार करूनही विमा कंपन्यांनी पंचनामे केलेले नाहीत. त्या सर्व शेतकऱ्यांचे नुकसान ग्राह्य धरून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी संघटनेने यावेळी केली आहे. तर विमा कंपन्यांनी आणि सरकराने संघटनेची मागणी मान्य न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले असा इशारा जिल्हाध्यक्ष गवळी यांनी दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Return Monsoon : परतीचा माॅन्सून महाराष्ट्रात दाखल; राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

Amaravati DCC Bank : धोरणात्मक निर्णय घेण्याची अमरावती जिल्हा बँकेवर बंदी

Marathwada Drought : मराठवाड्यातील दुष्काळ आणि अतिवृष्टी

MSP Procurement : मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी नावनोंदणी सुरू

Sugarcane Bill : दत्त साखर कारखाना मागील गळीत हंगामातील १०० प्रमाणे शेतकऱ्यांना दुसरा हप्ता देणार

SCROLL FOR NEXT