Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season 2024 : सिंधुदुर्गात रब्बी हंगामाला प्रारंभ; मशागतीला वेग

Rabi Sowing : लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्यात खरीप हंगाम यावर्षी लांबला. अजूनही काही भागात भातपीक कापणी आणि नाचणी पीक वेचणी सुरू आहे.

Team Agrowon

Sindhudurga News : जिल्ह्यात रब्बी हंगामाला तब्बल वीस ते पंचवीस दिवस विलंबाने प्रारंभ झाला आहे. शेती मशागतीला गती प्राप्त झाली आहे. सध्या शेतकरी जमिनीची नांगरणीत व्यस्त आहेत.

लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्यात खरीप हंगाम यावर्षी लांबला. अजूनही काही भागात भातपीक कापणी आणि नाचणी पीक वेचणी सुरू आहे. बरेच शेतकरी भातपीक लागवड असलेल्या शेतातच रब्बी उत्पादन घेतात.

लांबलेल्या खरीप हंगामाचा मोठा परिणाम यावर्षीच्या रब्बी हंगामावर झाला. रब्बी हंगाम तब्बल वीस ते पंचवीस दिवसांनी आता सुरू झाला आहे. शेतकऱ्यांनी रब्बी पिकाच्या दृष्टीने नांगरणी, कुंपण आदी कामे सुरू केली आहेत.

जिल्ह्यात रब्बी हंगामात प्रामुख्याने कुळीथ, भुईमूग, मूग, उडीद, कलिंगड, काकडी, टॉमेटो, कोबी, भातपीक, नाचणी पीक लागवड केली जाते. १० ते १५ हजार हेक्टर क्षेत्रावर जिल्ह्यात रब्बी पिकांची लागवड होते.

याशिवाय मुळा, पालेभाजी, फळभाज्या आदी पिकांची लागवड देखील केली जाते. जिल्ह्यातील पाण्याची उपलब्धता असलेल्या गावांमध्ये अलीकडे भाजीपाला लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chandrababu Naidu : आंध्र प्रदेशमध्ये केंद्रीय कृषी विद्यापीठ स्थापन करावे; मुख्यमंत्री नायडू यांची केंद्र सरकारकडे मागणी

Animal Health: निकृष्ट मुरघासाचा जनावरांच्या आरोग्यावर होतोय परिणाम

Sugarcane Price: ऊसदर जाहीर करा, बिले विहित मुदतीत द्या

Jivant Satbara: जिवंत सातबारा मोहिमेचा दुसरा टप्पा आजपासून सुरु, 'या' ६ महत्त्वांच्या दुरुस्त्या करता येतील

Drone Pilot Training: ड्रोन चालवायचा आहे? लायसन्स, प्रशिक्षण आणि सरकारी योजना जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT