Agricultural Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलासा, सिंचन प्रकल्पांतून पिकांसाठी पाणी

Rabi Crop Irrigation : खानदेशात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. काही पिके मळणीवरही येत आहेत. रब्बीसाठी यंदा गिरणासह अन्य सिंचन प्रकल्पांतून सिंचनासाठी पाणी मिळत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. काही पिके मळणीवरही येत आहेत. रब्बीसाठी यंदा गिरणासह अन्य सिंचन प्रकल्पांतून सिंचनासाठी पाणी मिळत आहे. खरिपात पिकांचे मातेरे झाले. आता रब्बीत खरिपातील नुकसानीची भरपाई निघेल, अशी अपेक्षा आहे.

गिरणा धरणातून मागील हंगामात रब्बीला पाणीच मिळाले नव्हते. कारण दुष्काळी स्थितीमुळे हे धरण मागील वेळेस फक्त ५६ टक्के भरले होते. यंदा हे धरण १०० टक्के भरले. यामुळे गिरणा पट्ट्यातील २१ हजार हेक्टरला या धरणातून पाणी मिळत आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात हतनूर, वाघूर, धुळ्यात अनेर, पांझरा या प्रकल्पांतूनही रब्बीस पाणी मिळत आहे.

हरभरा, दादर ज्वारी, मका, भाजीपाला पिके, कांदा, सोयाबीनची पेरणी रब्बी हंगामात सुमारे ११० टक्के झाली आहे. उन्हाळ पिकांचीदेखील पेरणी होत आहे. सोयाबीन पेरणीचेही नियोजन अनेकांनी केले असून, २००० ते २५०० हेक्टरपर्यंत जळगाव जिल्ह्यात रब्बीतील क्षेत्र पोचेल, असा अंदाज आहे. ही पेरणी सुरू आहे.

त्यात भुईमूग, सूर्यफूल पेरणीही होत आहे. सोयाबीनचे दर कमी अधिक झाले आहेत. परंतु रब्बीत मका, गहू, ज्वारी पीक परवडत नाही, असेही शेतकरी मानतात. खरिपातील पिके परवडली नाहीत. कापूस उत्पादक जेरीस आले आहेत. यंदा रब्बीबाबत अपेक्षा असून ऑक्टोबरच्या मध्यात रब्बीची पेऱणी सुरू झाली.

यंदा शेतकऱ्यांना खरिपात सोयाबीनचे चांगले उत्पादन आले. रब्बीतही अनेकांनी सोयाबीनला पसंती दिली आहे. त्यास दोन फवारण्या व एकदा रासायनिक खते देवूनही उत्पादन बऱ्यापैकी येते, असे निरीक्षण, अनुभव अनेकांना आहे. यामुळे यंदाही रब्बीत शेतकरी मका, ज्वारी यासह तेलबिया पिकांत सोयाबीनची पेरणी भुईमूगापेक्षा अधिक झाली आहे.

मका, गहू जोमात

कापूस पीक घेऊन त्यात मक्याची लागवड करण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले. पूर्वहंगामी कापूस पिकाखालील क्षेत्र त्यासाठी शेतकरी ऑक्टोबरच्या अखेरीस रिकामे करण्यास सुरवात झाली. त्यात पूर्वमशागत करून मका व अन्य भाजीपाला पिके घेतली आहेत. गहू पेरणीही यंदा जळगाव जिल्ह्यात सिंचन प्रकल्पातून पाणी मिळाल्याने ६० हजार हेक्टरवर झाली आहे. मका लागवड जळगाव जिल्ह्यात एक लाख दोन हजार हेक्टर एवढी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dry Fruits: दिवाळीत सुकामेव्याचे दर गगनाला, खोबरे दर दुप्पट

Crop Insurance: नुकसानग्रस्तांना विम्याची प्रतीक्षा

AI In Dairy Farming: ‘डेअरी फार्म ऑडिट’ महत्त्वाचे...

Desi Cow Conservation: स्थानिक गोवंशाच्या संवर्धनासाठी डोळस प्रयत्न आवश्यक

Kolhapur Jilha Bank: परराज्यांतील म्हैस खरेदीसाठी ‘केडीसीसी’कडून ३ लाखांपर्यंत कर्ज, धवलक्रांती योजना सुरु

SCROLL FOR NEXT