food grain prices agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : हवामानामुळे उना जिल्ह्यातील १० हजार हेक्टर क्षेत्रातील गहू व इतर पिकांचे नुकसान

Rabi crops damage : खराब हवामानामुळे उना जिल्ह्यातील १० हजार हेक्टर क्षेत्रातील रब्बी हंगामामधील पिकांचे खराब झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे २६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Rabi crops damage : हिमाचल प्रदेशामधील अनेक जिल्ह्यांमध्ये आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे उना जिल्ह्यातील १० हजार हेक्टर क्षेत्रातील रब्बी हंगामामधील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे २६ कोटी रुपयांचा फटका बसला. हाताशी आलेलं पिक गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपीट होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खराब हवामानामुळे हिमाचल प्रदेशामधील उना जिल्ह्यातील सुमारे १० हजार हेक्टर जमिनीवर पेरलेल्या रब्बी पिकांचे नुकसान झाले असून आतापर्यंत एकूण २६.५९ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज उनाचे उपायुक्त राघव शर्मा यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

ताज्या रिपोर्टनुसार सुमारे १० हजार टन गहू पिकाचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली आणि पिकांच्या नुकसानीचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे निर्देश कृषी व फलोत्पादन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

कृषी व फलोत्पादन विभागाच्या अधिकाऱ्यांसह पटवारींनी शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीचा सविस्तर अहवाल तयार करून तो तत्काळ पाठवावा, जेणेकरून बाधित शेतकऱ्यांना त्या आधारे नुकसान भरपाई मिळावी, अशा सूचनाही उपायुक्तांनी दिल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून भरपाई दिली जाईल.

शर्मा म्हणाले की, बागायती क्षेत्रात सुमारे २ हजार २५० शेतकर्‍यांना खराब हवामानामुळे फळझाडे आणि भाजीपाल्याचे सुमारे १८.२५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: तूर बाजारात चढ-उतार, गवार दरात वाढ, बटाटा बाजारात आवक वाढली, हिरव्या मिरचीच्या दरात बदल तर पपईचे दर टिकून

LPG Subsidy Rule: एलपीजी सिलिंडरच्या अनुदानाबाबत मोठा बदल; १ ऑक्टोबरपासून बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण अनिवार्य

Rainfall Deficit: पावसाच्या खंडाने पिकांवर विपरित परिणाम

Drought Like Conditions: नाशिक जिल्ह्यातील १० तालुक्यांत ट्रिगर-१ लागू

Fodder Farming: चारा पिकांच्या लागवडीला रब्बी हंगामात प्राधान्य देणार: मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन

SCROLL FOR NEXT