LPG Aadhaar Verification: सप्टेंबर महिना संपण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक असताना घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून अनुदानित घरगुती एलपीजी रिफिल बुक करण्यासाठी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे अद्याप प्रमाणीकरण न केलेल्या ग्राहकांनी ते लवकरात लवकर पूर्ण करून घेणे गरजेचे आहे..केंद्राच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबरपासून ज्या ग्राहकांचे बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेले नाही, त्यांना प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतरच अनुदानासह नियंत्रित किरकोळ विक्री दरात रिफिल बुक करता येणार आहे. ज्यांनी यापूर्वीच प्रमाणीकरण पूर्ण केले आहे, त्यांना पुन्हा ही प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही..LPG Booking Rules Change: एलपीजी सिलिंडर ग्राहकांसाठी ई-केवायसीची आजची अंतिम मुदत ; बुकिंगसाठी १ सप्टेंबरपासून नियम बदलणार.सिलिंडर मिळणे बंद होणार का?बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण पूर्ण केले नाही म्हणून ग्राहकांना एलपीजी सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद केला जाणार नाही. अधिकृत माहितीनुसार, प्रमाणीकरण न केलेले ग्राहकही LPG घेऊ शकतात; मात्र त्यांना लागू बाजारभावाने, अनुदानाशिवाय सिलिंडर घ्यावा लागू शकतो. त्यामुळे “ई-केवायसी केली नाही तर सिलिंडर मिळणारच नाही” असा अर्थ घेणे चुकीचे ठरेल..Biogas Subsidy: बायोगॅस लाभार्थ्यांना १.३० कोटींचे अनुदान मंजूर.बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण कसे कराल?ग्राहकांना बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.सिलिंडरच्या डिलिव्हरीच्या वेळी डिलिव्हरी कर्मचाऱ्यामार्फत प्रमाणीकरण करता येईल.गॅस वितरकाच्या शोरूममध्ये जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल.संबंधित तेल विपणन कंपनीच्या मोबाइल ॲपद्वारे घरबसल्या प्रमाणीकरण करता येईल.Indane ग्राहकांसाठी IndianOil ONEBharatgas ग्राहकांसाठी HelloBPCLHP Gas ग्राहकांसाठी HP PAY.८९.९ टक्के ग्राहकांचे प्रमाणीकरण पूर्णकेंद्र सरकारच्या १९ सप्टेंबर २०२६ रोजीच्या माहितीनुसार, देशातील २७.४३ कोटी म्हणजेच ८९.९ टक्के सक्रिय घरगुती LPG ग्राहकांचे बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. या ग्राहकांना आता पुन्हा कोणतीही प्रक्रिया करण्याची गरज नाही..त्यामुळे ज्यांचे प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे, अशा ग्राहकांनी १ ऑक्टोबरपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करून घेणे फायदेशीर ठरेल. LPG सेवांबाबत मदत हवी असल्यास १८०० २३३३ ५५५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क करता येईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.