Grape  Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Farming : ‘द्राक्ष व्यापाऱ्यांसाठी ‘क्यूआर कोड’

Grape Export : द्राक्षाचा हंगाम आता सुरू होतोय. काही ठिकाणी निर्यातीसाठीची द्राक्ष विकली जात आहेत. दिल्ली बाजारात जाणारी द्राक्षे काढली जात आहेत. आठ-दहा दिवसांत हंगामाला गती येणार आहे.

Team Agrowon

Sangli News : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून केली जाणारी फसवणूक टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने आधुनिक प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी गुरुवारी (ता. २३) पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी म्हणाले, की द्राक्षाचा हंगाम आता सुरू होतोय. काही ठिकाणी निर्यातीसाठीची द्राक्ष विकली जात आहेत. दिल्ली बाजारात जाणारी द्राक्षे काढली जात आहेत. आठ-दहा दिवसांत हंगामाला गती येणार आहे. देशभरातील व्यापारी सांगलीत दाखल होतील व शेतकऱ्यांच्या बांधावर जातील.

काही नवे व्यापारी आहेत, काही जुने असतील. या व्यापाऱ्यांनी आपली नोंदणी बाजार समितीकडे करणे गरजेचे आहे. फसवणूक टाळण्यासाठी हे आवश्‍यक आहे. शिवाय, कायदा सुव्यवस्थेच्या दृष्‍टिने आपण दक्षता घेणार आहोत.

परराज्यातून येणाऱ्या टोळ्यांची माहिती असायला हवी. शेतकऱ्यांनीही ती काळजी घ्यावी. किमान आधारकार्ड, मोबाइल क्रमांक घ्यावा. आधारकार्ड खरे असल्याची खात्री करून घ्यावी.

ते म्हणाले, की बाजार समिती आणि द्राक्ष संघाने याबाबत दक्षता घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. जिल्ह्यात द्राक्ष खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांची द्राक्ष बागायतदार संघ, बाजार समितीकडे नोंदणी करावी. त्यांनी व्यापाऱ्यांना क्यूआर कोड द्यावा.

तो तपासून शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांशी व्यवहार करावा. फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सावध करावे. उधार व्यवहार करताना पूर्ण खात्री आवश्य करावी. आम्ही ‘क्यूआर कोड’द्वारे त्या व्यापाऱ्यांच्या नोंदी करीत आहोत. शेतकऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने त्या क्यूआर कोडची खात्री करून घ्यावी आणि मग व्यवहार करावेत. जेणेकरून आर्थिक फसवणूक टाळता येईल.

व्यापक निर्णयाचा प्रयत्न

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, की द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसणवूक टाळण्यासाठी एक व्यापक निर्णय आवश्यक आहे. तो कायदेशीर पद्धतीने घेण्याबाबत आम्ही विचार करत आहोत. त्यात शेतकऱ्यांची मदत आवश्यक असेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT