Indian Farmer Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer ID Registration: ‘फार्मर आयडी’ नोंदणीत पुणे तिसरे; साडेचार लाख शेतकऱ्यांना लाभ

Digital Farmer Identity: केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी ‘ॲग्रीस्टॅक’ अर्थात ‘फार्मर आयडी’ नोंदणी मोहीम राबवली जात आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ७८ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, पुणे जिल्ह्यात साडेचार लाख शेतकऱ्यांना ‘फार्मर आयडी’ मिळाला आहे.

गणेश कोरे

Pune News: शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा थेट लाभ देण्यासाठी स्वतंत्र ओळखीचा सांकेतांक क्रमाक देणाऱ्या ‘ॲग्रीस्टॅक’ (फार्मर आयडी) नोंदणीमध्ये पुणे तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर, अहिल्यानगर आणि नाशिकने देखील आघाडी घेतली आहे. पुणे जिल्ह्यातील सुमारे साडेचार लाख शेतकऱ्यांना ‘फार्मर आयडी’ मिळाला आहे.

राज्यात आतापर्यंत ७८ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करण्यात आले असून, आधार कार्ड, पॅन कार्ड, बॅंक खाते क्रमांक आणि शेतीच्या क्षेत्रासह विविध पिकांची माहिती एकत्रित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या कामासाठी पहिल्यांदा कृषी विभागाकडे जबाबदारी देण्यात आली होती.

मात्र कृषी सहायकांनी हे काम महसूलचे असून, काम करण्यास विरोध केला होता. यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीला विलंब झाला. तर पुणे जिल्ह्यातील कृषी सहायकांनी हे काम पुन्हा सुरू करावे यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बैठका घेतल्या होत्या.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कृषी सहायकांनी काम सुरू केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामुळे आता काहीशी संथ झालेली ही कामे सुरू झाली असून, जिल्ह्यात साडेचार लाख शेतकऱ्यांना आयडी देण्यात आला आहे. तर, दहा लाखांपेक्षा अधिक आयडी देण्याचे काम प्रलंबित असल्याचे प्रशासनाने सांगितले.

माझ्या कार्यक्षेत्रातील पिंपरी आणि महाळुंगे गावांतील ४५ टक्के शेतकऱ्यांना आयडी देण्यात आले आहेत. तर ५५ टक्के काम प्रगतिपथावर आहे.
रवी पारधी, कृषी सहाय्यक, आंबेगाव. जि. पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Black Marketing: राज्यात खतांचा काळाबाजार थांबेना! ८ महिन्यांत ४४ हजार छापे, निकृष्ट दर्जावरून १,१३९ परवाने रद्द, निलंबित

Local Body Election: महापालिकेत मतदानासाठी ग्रामीण भागातील नावांची नोंदणी

Surat Chennai Highway: सोलापूर जिल्ह्यातील ५६० हेक्टरचे संपादन पूर्ण

Sugarcane Farmers: जलद ऊसतोडसाठी पैशांची मागणी

Soil Health: जमीन सुधारणेसाठी नैसर्गिक शेतीकडे वळा; डॉ. प्रशांत बोडके

SCROLL FOR NEXT