APMC Inspection Agrowon
ॲग्रो विशेष

Pune APMC Inspection: पुणे बाजार समितीमधील आडत्यांची दफ्तर तपासणी गुलदस्तात

APMC Market Audit: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील विभाग प्रमुखांच्या बदल्यांनंतर फळे भाजीपाला विभागातील आडत्यांच्या दफ्तर तपासणीची धडक मोहीम हाती घेण्यात आली होती.

गणेश कोरे

Pune News: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील विभाग प्रमुखांच्या बदल्यांनंतर फळे भाजीपाला विभागातील आडत्यांच्या दफ्तर तपासणीची धडक मोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र या दफ्तर तपासणीचा अहवाल गुलदस्तात आहे. अद्याप तपासणी सुरू असून, अंतिम झाल्यावर माहिती दिली जाईल, असे फळे भाजीपाला विभागप्रमुख प्रशांत गोते यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून आडत्यांच्या संशयास्पद व्यवहारांवर बाजार समितीचे लक्ष होते. यामधील काही अडत्यांचे दफ्तर ताब्यात घेऊन, तपासणी सुरू केली. मात्र अद्याप दफ्तर तपासणी सुरू असून, टप्प्याटप्प्याने सर्व आडत्यांची तपासणी होणार असल्याचे गोते यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या काही वर्षांत अनेक व्यापाऱ्यांची दफ्तर तपासणी करण्यात आली. मात्र त्याचा कोणताही अहवाल बाजार समितीने जाहीर केलेला नाही. यामुळे दफ्तर तपासणी ही प्रशासकीय आणि नित्य बाब असल्याचे सचिव राजाराम धोंडकर यांनी सांगितले असले तरी, तपासणी अहवाल अद्याप बाहेर न आल्याने दफ्तर तपासणीबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

आडत्यांकडून वाच्यता नाही

अनेक आडत्यांची दफ्तर तपासणी झाल्यानंतर त्यात विसंगती आढळते. यावर तडजोड करून, प्रकरण मिटविले जाते. आडतेच दोषी आढळत असल्याने आडते स्वतःहून झालेल्या कारवाईबाबत वाच्यता करत नसल्याची चर्चा बाजार आवारात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT