Bamboo Festival Agrowon
ॲग्रो विशेष

Bamboo Festival : ‘पुणे बांबू फेस्टिव्हल’ला प्रारंभ

Bamboo Farming : बंगळूरच्या बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित पुणे बांबू फेस्टिव्हला शुक्रवारी (ता. २२) प्रारंभ झाला.

Team Agrowon

Pune News : बंगळूरच्या बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित पुणे बांबू फेस्टिव्हला शुक्रवारी (ता. २२) प्रारंभ झाला. या फेस्टिव्हल आणि प्रदर्शनामध्ये बांबूच्या रोपांपासून ते चहा आणि कपड्यांपर्यंत विविध उत्पादनांचे सादरीकरण करण्यात आले आहे. हे प्रदर्शन गणेश कला-क्रीडा केंद्रामध्ये रविवार (ता. २४)पर्यंत खुले आहे.

या फेस्टिव्हलमध्ये बांबूपासून बनविण्यात येणाऱ्या वस्तूंमध्ये बांबूचा टूथ ब्रश, बांबूची बाटली, सॉक्स, शर्ट्स, पुस्तके, लॅम्प्स, फर्निचर, बांबूच्या झोपड्या, घड्याळे, झोपड्या, दागिने अशा वैविध्यपूर्ण, तसेच कलात्मक उत्पादनांचा समावेश आहे.

फेस्टिव्हलच्या माध्यमातून शेतकरी, उत्पादक, बँकर्स, खरेदीदार, ग्राहक असे सारेच एका छताखाली एकत्र आले आहेत. त्यांच्यात दुवा साधण्याचे काम या बांबू फेस्टिव्हलद्वारे होत असल्याचे बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. हेमंत बेडेकर यांनी सांगितले.

बांबू उद्योगात काम करण्यास मोठा वाव आहे. बांबू हा शेतीला जोड व्यवसायही म्हणूनही घेऊ शकतो. तसेच त्याची लागवड किंवा संवर्धनामध्ये शेतकऱ्याला इतर पिकांच्या तुलनेने खर्च कमी व विशेष श्रम नाहीत.

त्यामुळे शेतकरी याकडे वळविण्यासाठी, त्याच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी या ‘बांबू फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले असल्याचेही बेडेकर म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: उसाचा १०० रुपये दुसरा हप्ता तातडीने जमा करा अन्यथा आंदोलन, 'स्वाभिमानी'चा कारखान्यांना इशारा

Parbhani Dam Water Update: परभणी जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत ११, मध्यम प्रकल्पांत ९ टक्के पाणीसाठा

Turmeric Farmers Support: हळदीला विमा संरक्षणाने शेतकऱ्यांना दिलासा

Fertilizer Dealers Complaint: खत विक्रीत लिंकिंगचा आरोप

Women Farmers: ‘वसंधुरा’च्या महिलांकडून सायकल कोळप्याने कोळपणी

SCROLL FOR NEXT