sandeep Shirguppe
सध्या बदलत्या वातावरणामुळे शेती पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे.
पारंपारिक पिके सोडून बांबूची लागवड शेतकऱ्यांसाठी चांगली कल्पना ठरत आहे. याला वेळ लागतो परंतु चांगले पैसे कमवण्याची संधी आहे.
नवीन वन कायद्यानुसार बांबू तोडण्यावर निर्बंधही कमी करण्यात आले आहेत. यामुळे कोणीही बांबू लागवड करू शकतो
भारत सरकारकडून राष्ट्रीय बांबू मिशन अंतर्गत सध्या एका शेतकर्याला प्रति रोप १२० रुपये सरकारी सहाय्य मिळणार आहे.
जानेवारी २०१८ मध्ये केंद्र सरकारने बांबू झाडांच्या श्रेणीतून काढून टाकले. हा कायदा केवळ खासगी जमिनीसाठी केलाय.
बांबूच्या शेतीसाठी सुमारे ४ वर्ष लागतात. चौथ्या वर्षी त्याची कापणी होते. बांबूची रोपे काही मीटर अंतरावर लावली जातात.
शेतकरी त्याच्या लागवडीबरोबरच काही इतर शेती देखील करतात जे सहजपणे मध्यभागी केली जातात.
बांबू शेती करण्यापूर्वी वाणांची माहिती घ्यावी लागेल. याचबरोबर याचे मार्केट कुठे उपलब्द आहे याचीही माहिती घ्यावी लागेल.
बांबूच्या १३६ प्रजाती आहेत. यामुळे कोणत्या बांबूची आपण लागवड करायची याबाबत पहिल्यांदा माहिती करून घ्यावी लागते.
४ वर्षानंतर तुम्ही साडे तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवू शकता. दरवर्षी प्रत्यारोपण करण्याची आवश्यकता नाही. बांबूची लागवड सुमारे ४० वर्षे टिकते.