Summer Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water for Wildlife : वन्यप्राण्यांसाठी पाणवठ्यांची सोय

Deccan Plateau Trust: डेक्कन प्लॅटू वाइल्डलाइफ कंजर्वेशन ट्रस्ट’ या संस्थेने वनविभागाने वन्य प्राण्यांसाठी तयार करण्यात आलेल्या पाणवठ्यांची दुरुस्ती व त्यामध्ये पाणी भरण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

Team Agrowon

Baramati News: उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून पाणीटंचाईची समस्याही तीव्र होत आहे. पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्याने दौंड, बारामती वनक्षेत्रामधील वन्यजीवांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यातून वन्यप्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्त्यांजवळ येत आहेत.

काहीवेळा रस्ते ओलांडताना वन्यप्राण्यांचे अपघात होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर ‘डेक्कन प्लॅटू वाइल्डलाइफ कंजर्वेशन ट्रस्ट’ या संस्थेने वनविभागाने वन्य प्राण्यांसाठी तयार करण्यात आलेल्या पाणवठ्यांची दुरुस्ती व त्यामध्ये पाणी भरण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

वनसंरक्षण व वनवृद्धीसाठी ही संस्था काम करते. संस्थेमार्फत बारामती व दौंड येथील वन विभागातील पाणवठ्यांचे निरीक्षण करून गरज असेल तेथे दुरुस्ती करून दररोज स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

या वेळी संस्थेचे अध्यक्ष विराज फरांदे यांनी सांगितले, की वनविभागाकडील उपलब्ध संसाधने व मर्यादांचा विचार करता सेवाभावी संस्थांनी वन संरक्षण तसेच वन्यप्राणी संरक्षणासाठी पुढे आले पाहिजे. वन्य वन्यक्षेत्रातील पाणवठ्यांवर पाणी पुरविण्याबरोबरच त्यांची देखभाल व निगा राखणे हे काम देखील संस्थेमार्फत हाती घेण्यात आले आहे.

उन्हाळा संपेपर्यंत वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, यासाठी संस्थेने तयारी करून ठेवली आहे. या कामासाठी वनविभागातील अधिकारी तसेच कर्मचारी यांची साथ मिळत असून संस्थेचे विश्‍वस्त विनोद कबनूरकर, अवधूत कोल्हे, प्रणित साळवे, डॉ. धनंजय भोईटे, विजय कडू, महेश भोईटे आदींचे सहकार्य मिळत आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT