Agriculture News  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : रब्बीसाठी पूर्ण वेळ वीज, रोहित्रे तत्काळ द्या

Rabi Season : सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या मागण्यांसाठी तुपकर यांनी आंदोलन हाती घेतले आहे. त्यानुसार जिल्ह्यात एल्गार रथयात्रा सुरू आहे.

Mahesh Gaikwad

Buldana News : ‘‘शेतकरी आधीच संकटात आहे. त्यात विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात अधिकच भर पडली आहे. रब्बीसाठी पूर्ण वेळ वीज द्यावी. तसेच नादुरुस्त रोहित्रे तातडीने बदलून द्यावीत, अन्यथा ‘महावितरण’चे कार्यालय जागेवर ठेवणार नाही,’’ असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

तुपकर यांची ‘एल्गार रथयात्रा’ सध्या मेहकर-लोणार तालुक्यात आहे. या यात्रेदरम्यान गुरुवारी (ता. ९) आयोजित सभेत तुपकर यांनी ‘महावितरण’ला इशारा दिला.

सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या मागण्यांसाठी तुपकर यांनी आंदोलन हाती घेतले आहे. त्यानुसार जिल्ह्यात एल्गार रथयात्रा सुरू आहे. यात्रेने मेहकर तालुक्यातील जनुना, विठ्ठलवाडी, पांगरखेड, गोहगाव दांदडे, डोणगाव, खंडाळा, अंत्री देशमुख, चिंचोली बोरे व लोणार तालुक्यातील सुलतानपूर, रांजणी, जांबुल, मांडवा आदी गावांतून प्रवास केला आहे. यात्रेला शेतकरी, शेतमजूर, तरुणांचा प्रतिसाद मिळत आहे.

तुपकर म्हणाले, ‘‘खरीप हंगामात पावसात खंड पडल्याने तसेच पिवळा मोझॅक व गुलाबी बोंड अळीमुळे सोयाबीन-कापसाच्या उत्पन्नात प्रचंड घट झाली आहे. शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च देखील निघणे अशक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बीपासून थोड्याफार आशा आहेत.

मात्र वीज वितरण कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे खरिपाप्रमाणेच रब्बीतील पिकांचीही नासाडी होण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांकडे थोडेफार पाणी आहे, ते शेतकरी हरभरा, गहू, तूर ही पिके जगविण्याची धडपड करीत आहेत.

परंतु पिकांना पाणी देण्यासाठी विजेची अडचण येत आहे. वीज वितरण कंपनीने नादुरुस्त रोहित्र तातडीने दुरुस्त करून द्यावीत, रब्बीसाठी पूर्ण वेळ वीजपुरवठा द्यावा. वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना वेठीस धरल्यास कंपनीला धडा शिकवू.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT