Shaktipeeth Expressway Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शुक्रवारी १२ जिल्ह्यांत आंदोलन

Protest against Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शुक्रवारी (ता. २४) राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्धार शुक्रवारी (ता.१७) करण्यात आला. या वेळी १२ जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचेही ठरले.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शुक्रवारी (ता. २४) राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्धार शुक्रवारी (ता.१७) करण्यात आला. या वेळी १२ जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचेही ठरले.

महामार्गात बाधित होणाऱ्या १२ जिल्ह्यांतील आंदोलक प्रतिनिधींची ऑनलाइन बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे होते.श्री. फोंडे म्हणाले, ‘‘विधानसभा निवडणुकीनंतर शक्तिपीठ महामार्ग रेटण्यासाठी फक्त कोल्हापुरातून विरोध होत असून, इतर जिल्ह्यांतून विरोध होत नाही,

असा खोटा प्रसार राज्य सरकारकडून केला जात आहे. यापूर्वी कोल्हापूरसह इतर जिल्ह्यांमध्ये आंदोलन सुरू होते व आताही सुरू आहे. या सरकारला कंत्राटदारांचे भले करण्यासाठी व उद्योगपतींना नैसर्गिक साधन संपत्ती, खनिज संपत्तीची लूट करण्यासाठी हा महामार्ग म्हणजे रेड कार्पेट आहे.’’

या वेळी नांदेडचे गोविंद घाटोळ, लातूरचे गजेंद्र येळकर यांनी भूमिका मांडली. सतीश कुलकर्णी, शांतिभूषण कच्छवे, अभिजित देशमुख, गणेश घोडके, सुभाष मोरलवार, गजानन तीमेवार, केतन सारंग, भारत महाजन, सुदर्शन पडवळ, संभाजी फरताळे, अनिल बेळे, केदारनाथ बिडवे, श्रीधर माने, संतोष ब्याळे, सतीशराव घाडगे, सुनील भोसले, मेहताब पठाण, रवी मगर, परमेश्‍वर मोठे, बसवराज झुंजारे, नानासाहेब चव्हाण, रामेश्‍वर चव्हाण, उमेश एडके, प्रकाश पाटील, सुरेश राजापूरकर आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT