Farmers Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Protest For Water : पालखेडच्या पाण्यासाठी येवला येथे पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या

Agriculture Irrigation : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे तसेच येवला बाजार समितीचे संचालक सचिन आहेर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Team Agrowon

Nashik News : अल्प पावसामुळे यंदा पाण्याचे दुर्भिक्ष्य असून, सध्या पालखेड डाव्या कालव्याला पूर पाणी सुरू असल्याने या पाण्यातून कोपरगाव तालुक्यातील लाभक्षेत्रातील बंधारे भरून द्यावेत, अशी मागणी कोपरगाव तालुक्यांतील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली. येवल्याच्या पूर्व भागातील राहिलेले बंधारे भरून देण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली. यासाठी शेतकऱ्यांनी येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मारला होता.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे तसेच येवला बाजार समितीचे संचालक सचिन आहेर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. चालूवर्षी कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागात खरीप व रब्बी हंगामात पुरेशा प्रमाणात पाऊस झालेला नाही.पिण्यासाठी तसेच जनावरांसाठी पाण्याची मोठी अडचण निर्माण झालेली आहे.

लाभक्षेत्रातील कोळ नदीवरील बंधारे व पाझरतलाव पालखेडच्या पाण्याने भरून मिळावेत यासाठी या शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी लेखी पत्रव्यवहार करून प्रत्यक्ष व फोनद्वारे मागणी केलेली आहे. मात्र प्रत्यक्षात पाझर तलावात पालखेडचे पाणीच आले नाही.

त्यामुळे या भागातील नागरिकांना व जनावरांना सध्या पिण्याच्या पाण्याची अडचण भासत आहे. पालखेडच्या लाभक्षेत्रातील सावळगाव, शिरसगाव, तिळवणी, आपेगाव, गोधेगाव, करंजी, पढेगाव, कासली, ओगदी, दहेगाव बोलका, आंचलगाव, बोलकी, शिंगणापूर, नाटेगाव, तळेगावमळे, उक्कडगाव येथील बंधारे भरून देण्याची मागणी करण्यात आली.

निवेदन पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यास सरोदे यांना देण्यात आले. केशव भवर, अशोक गायकवाड, अशोक शिंदे, संतोष गायकवाड, केशव गायकवाड, भरत कोल्हे, संपत भागवत, अन्सार पटेल आदींच्या शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. येवला तालुक्यातील पूर्व भागातील बोकटे, देवळाने शिवारात चाऱ्यांद्वारे पाणी सोडून बंधारे भरून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी येवला बाजार समितीचे संचालक सचिन आहेर यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

NHB Subsidy Cut: लेखाजोखा ‘एनएचबी’चा!

AI in Agriculture: कृषीतील एआय, रोबोटिक्स, ड्रोन तंत्रज्ञानाला नवी दिशा

POCRA Project Audit: ‘पोकरा’ प्रकल्पाचे पूर्ण लेखापरीक्षण करा: किशोर तिवारी

Women’s Freedom and Equality: स्त्रीला जोखडात बांधणारी विचारसरणी उखडून फेका: राहुल गांधी

Kharif Crop Growth: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पिके बहरली

SCROLL FOR NEXT