Land Acquisition Agrowon
ॲग्रो विशेष

Land Acquisition : भूसंपादनातील वाढीव मोबदल्यासाठी निदर्शने

Land Acquisition Compensation : ज्या शेतकऱ्यांना दर मान्य नाही, त्यांनी न्यायालयात जाण्याच्या अटीवर भूसंपादनाची रक्कम स्वीकारावी, अन्यथा भूसंपादनाच्या नियमानुसार सक्तीने जमीन ताब्यात घेण्याशिवाय पर्याय उरणार नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले होते.

सुदर्शन सुतार

Solapur News : सोलापुरातून जाणाऱ्या सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग व रिंगरोड संघर्ष समितीच्यावतीने या प्रकल्पांसाठी शेतजमीन देणाऱ्या शेतकऱ्यांनी वाढीव मोबदला मिळावा, यासाठी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

या आंदोलनात संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, कार्याध्यक्ष स्वामिनाथ हरवाळकर, सरचिटणीस वीरेश बंगरगी, नामदेव पवार, ओमप्रकाश पाटील, प्रियांका दोड्याळे, दिगंबर कांबळे, दीपक कदम, परमेश्वर गाढवे यांच्यासह विविध शेतकरी संघटनेचे नेते बाधित शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दरम्यान, ज्या शेतकऱ्यांना दर मान्य नाही, त्यांनी न्यायालयात जाण्याच्या अटीवर भूसंपादनाची रक्कम स्वीकारावी, अन्यथा भूसंपादनाच्या नियमानुसार सक्तीने जमीन ताब्यात घेण्याशिवाय पर्याय उरणार नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले होते. त्यावर शेतकरी आक्रमक दिसून आले.

‘तुम्ही जमिनी घ्यायला वावरात तर या आम्ही पाहून घेऊ,’’ अशा शब्दांत आक्रमक होत प्रशासनाला थेट इशाराच शेतकऱ्यांनी दिला. अध्यक्ष मोरे, कार्याध्यक्ष हरवाळकर यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर या वेळी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला.

हिवाळी अधिवेशनावर मोर्चा

महामार्ग आणि रिंगरोड बाधित शेतकऱ्यांना प्रत्येकी एक कोटीची नुकसान भरपाई देण्याची मागणी या वेळी करण्यात आली. तसेच १३ डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही या वेळी ठरले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Germination Complaints: सोयाबीन उगवण तक्रारी आठ हजारांवर

Youth Protest: तरुणांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा; सरकार चर्चेसाठी तयार, ‘सीजेपी’च्या अटी कायम

Rahul Gandhi: विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची चौकशी करा : राहुल गांधी

Farm Loan Waiver List: मुहूर्ताची यादी ५३३ शेतकऱ्यांची !

Monsoon Rain Forecast: पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ कायम

SCROLL FOR NEXT