Ujani dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Water Level : उजनीची वाटचाल साठ टक्क्यांकडे

Ujani Water Capacity : पुण्याकडील पाण्याचा विसर्ग कायम राहिल्याने उजनी धरणातील पाणीपातळीने या आधीच ५० टक्क्यांची पातळी ओलांडली.

Team Agrowon

Solapur News : पुण्याकडील पाण्याचा विसर्ग कायम राहिल्याने उजनी धरणातील पाणीपातळीने या आधीच ५० टक्क्यांची पातळी ओलांडली. आता संथगतीने ही पाणीपातळी शुक्रवारी (ता. ६) ५७ टक्क्यांपर्यंत पोहोचली. येत्या दोन दिवसांत ती ६० टक्क्यांवर पोहोचणार आहे.

पाऊस ओसरल्याने पुण्याकडील धरणांतून विसर्ग कमी झाला असला, तरी तो कायम आहे. शुक्रवारी (ता. ६) पाण्याचा विसर्ग ७३३१ क्युसेकपर्यंत सुरू होता. गेल्या आठवड्यात हाच विसर्ग तब्बल ४० हजार क्युसेकपर्यंत होता.

शुक्रवारी धरणात एकूण पाणीपातळी ४९४.६८० मीटरपर्यंत होती. एकूण पाणीसाठा ९३.९७ टीएमसी आणि त्यापैकी उपयुक्त साठा ३०.३१ टीएमसीपर्यंत पोहोचला. तर पाण्याची टक्केवारी ५६.५८ टक्क्यांवर पोहोचली. दरम्यान, पाण्याच्या उपलब्धतेमुळे सध्या सीना-माढा योजनेला ३३३ क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.

जायकवाडीतील आवक घटली; पाणीसाठा ४८ टक्के

छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी प्रकल्पातील पाण्याची आवक प्रचंड प्रमाणात घटली आहे. शुक्रवारी (ता. ६) सकाळी प्रकल्पातील पाणीसाठा ४७.७९ टक्के होता. गतवर्षी आजच्याच दिवशी जायकवाडी प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा जवळपास ९९.९५ टक्के होता.

पाऊसच नसल्याने यंदा पाणीसाठा अजूनही निम्म्यापेक्षा कमीच आहे. गुरुवारी (ता. ५) जायकवाडीतील उपायुक्त पाणीसाठा ४७.७९ टक्क्यांवर पोहोचला. त्या वेळी आवक घटून १७१५ क्युसेक झाली. त्यातही आता घट झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT