Cotton Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Productivity : क्षेत्र कमी तरीही वाढली कापसाची उत्पादकता

Cotton Production : मॉन्सूनोत्तर पाऊस आणि सिंचनाच्या सोयींमुळे शेतकऱ्यांनी आवश्‍यकवेळी पिकाला पाणी दिले.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : मॉन्सूनोत्तर पाऊस आणि सिंचनाच्या सोयींमुळे शेतकऱ्यांनी आवश्‍यकवेळी पिकाला पाणी दिले. परिणामी देशासह राज्यात कापसाची उत्पादकता वाढल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

त्यामुळेच देशात सरासरी ३०० लाख गाठींची उत्पादकता अपेक्षित असताना आता ती ३२० लाख गाठींपर्यंत पोचेल, असा अंदाज युनायटेड स्टेटस डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर (युएसडीए) कडून वर्तविण्यात आला आहे.

देशात सरासरी १३० लाख हेक्‍टरवर तर महाराष्ट्रात ४५ ते ४८ लाख हेक्‍टर त्यातही विदर्भात सुमारे १८ लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड होते. एकट्या यवतमाळ जिल्ह्याचे कापसाखालील क्षेत्र पावणेपाच लाख हेक्‍टर आहे. २०२३-२४ या वर्षातील खरीप हंगामात सुरवातीला पावसाने खंड दिला. त्यामुळे सर्वच पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडल्या. त्यानंतर पावसाची संततधार झाली.

या दोन्ही कारणांमुळे खरिपातील पिकांची उत्पादकता प्रभावित होईल, अशी भीती वर्तविली जात होती. त्यानुसारच कापसाच्या उत्पादकतेबाबत वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यानुसार आराखडे बांधले जात होते. त्याच आधारावर कापसाची उत्पादकता यंदा ३०० लाख गाठींची राहील, असा अंदाज वर्तविला गेला.

दरम्यान, जागतिकस्तरावर कापसाचा साठा संपत आल्याचे सांगत देशांतर्गत कापूस दरवाढ होत असल्याबाबत विपणन तज्ज्ञांनी मत व्यक्‍त केले होते. या साऱ्या घडामोडीत आता ‘युएसडीए’कडून सुधारित अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार भारतात कापूस उत्पादकता पूर्वीच्या ३०० लाख गाठींवरुन ३१५ ते ३२० लाख गाठींपर्यंत राहण्याची शक्‍यता आहे.

‘सीसीआय’कडून विक्रमी खरेदी

२०२०-२१ या कोरोना कालावधीत भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) कडून विक्रमी ८० लाख गाठींची कापूस खरेदी झाली. त्यानंतर यंदाच २५ लाख गाठी इतका कापूस खरेदी केला गेला. कोरोनानंतर यंदा पहिल्यांदाच ‘सीसीआय’ने विक्रमी खरेदी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

देशांतर्गत १३० लाख हेक्‍टर सरासरी कापूस लागवड क्षेत्र आहे. २०२३-२४ या वर्षातील खरीप हंगामात सरासरीच्या सहा टक्‍के क्षेत्र कमी होते. परंतु मॉन्सूनोत्तर, अवकाळी पाऊस तसेच सिंचनाच्या सोयी असलेल्या शेतकऱ्यांकडून पिकाची गरज ओळखत पाणी देण्यात आले. त्यामुळे उत्पादकता ३२० लाख गाठींपर्यंत पोचण्याचा अंदाज ‘युएसडीए’ने वर्तविला आहे.
- डॉ. वाय.जी. प्रसाद, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Fertiliser Linking : उत्तर प्रदेशच्या धर्तीवर खत लिकिंगसाठी महाराष्ट्रात नवा नियम आणणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Blight Disease: बदलत्या वातावरणात करपा रोगाची शक्यता

Raju Chaudhari Success Story: कडा ते कॅनडा

Nilesh Rane: कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या मदत प्रश्नी निलेश राणेंनी कृषीमंत्र्यांना घेरले

SCROLL FOR NEXT