Temperature Control Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Silk Cocoon Production: उष्णतेवर नियंत्रण मिळवून दर्जेदार रेशीम कोष उत्पादन

Sericulture Innovation: उष्णतेच्या कडाक्यातही प्रयोगशीलतेच्या जोरावर नांदेडच्या दाजीराव शिंदे यांनी रेशीम कोष उत्पादनात विक्रमी यश मिळवले आहे. स्थानिक जुगाड, माहिती तंत्रज्ञान आणि बांधिलकीच्या बळावर त्यांनी तापमानावर नियंत्रण मिळवले.

कृष्णा जोमेगावकर

Nanded News: चाळीस अंशांवर गेलेल्या तापमानामुळे रेशीम कोष घेणे अशक्य असते. परंतु जोमेगाव (ता. लोहा) येथील प्रगतिशील युवा शेतकरी दाजीराव दिगंबर शिंदे या शेतकऱ्याने मोठा भाऊ हणमंत शिंदे यांच्या भक्कम साथीने उष्ण तापमान दहा अंशाने कमी करून रेशीम कोषाचे चांगले उत्पादन घेतले. या कोषाला बीड बाजारात सर्वोच्च ५६५ रुपयांचा दर मिळाला. एप्रिलमधील उष्णतेत तुतीची बॅच घेणे अशक्य असताना वाढत्या तापमानावर नियंत्रण मिळवून उत्पादित रेशीम कोष उत्पादनाची अनेकांनी प्रेरणा घेतली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून रेशीम कोषाचे उत्पादन घेणारे दाजीराव शिंदे या शेतकऱ्याने प्रयोगशीलतेच्या जोरावर रेशीम शेतीला गवसणी घातली आहे. चिबाड असलेल्या सव्वा एकरमध्ये तुतीची लागवड करून रेशीम कोष उत्पादनातला सुरुवात केली. प्रारंभी फारशी माहिती नव्हती. परंतु समाज माध्यमावर असलेल्या कोष उत्पादकांच्या विविध समूहाकडून मिळणारी माहिती आत्मसात केली.

तब्बल ३६ व्हॉट्‌सॲप ग्रुपवरून माहिती संकलित करून दाजीराव शिंदे यांनी कोष उत्पादनात सातत्य टिकवून ठेवले. गेल्या वर्षी त्यांनी उभारलेल्या कीटक संगोपनगृहात चार, तर इतरांच्या शेडमध्ये दोन अशा सहा बॅच घेऊन साडेचार लाखांचे उत्पादन घेतले आहे.

दाजीराव शिंदे यांनी २० मार्च रोजी सुरू केलेल्या बॅचचा उष्णतेपासून बचाव करण्यासाठी कीटक संगोपनगृहाच्या छतावर ज्वारीचा कडबा अंथरला, तर चारही बाजूंनी बारदाना लावून त्यावर पाण्याचे तुषार सोडले. यामुळे आतील तापमान दहा अंशांनी कमी केले. आर्द्रतेचे प्रमाणही ४५ ते ४५ टक्के राखले.

पाल्यामध्येही ओलावा टिकून राहिल्याने कोषाचे एक क्विंटल ६८ किलो उत्पादन घेतले. या कोषाला आठ एप्रिल रोजी बीड बाजारात ५६४ रुपये प्रति किलो दर मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या कामात मोठा भाऊ हनमंत शिंदे यांचे भक्कम पाठबळ मिळाल्याचे ते सांगतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: कोकण, घाटमाथा, मराठवाडा, विदर्भात मुसळधारेचा इशारा

Agriculture Minister : कृषिमंत्र्यांबाबत मंगळवारपर्यंत निर्णय; ...तर धनंजय मुंडेंना पुन्हा संधी देऊ : उपमुख्यमंत्री अजित पवार

Raigad Fruit Farming : तीन हजार हेक्‍टरवर फळ लागवड

Latur Solar Project : सौर कृषी वाहिनी योजनेत लातूरची आघाडी

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’साठी जमीन मोजणीस येणाऱ्यांना गावबंदी

SCROLL FOR NEXT