Farmer Tachnology agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Tachnology : शेतकरी हायटेक झाल्यास उत्पादन खर्च २५ टक्क्यांनी कमी कृषी मंत्र्यांचा विश्वास

Dhananjay Munde : फवारणीसाठी 'ड्रोन'चा वापर करावा, पर्यायाने शेतकरी 'हायटेक' झाल्यास उत्पादन खर्च २५ टक्क्यांनी कमी होईल असे धनंजय मुंडे म्हणाले

sandeep Shirguppe

Agriculture News : सध्या शेतीकडे व्यावसायिकपणे बघण्याची गरज आहे. बदलत्या काळात शेतकऱ्यांनी कमी श्रमात जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करीत शेतीत अत्याधुनिक यंत्रांच्या वापरावर भर द्यावा. फवारणीसाठी 'ड्रोन'चा वापर करावा, पर्यायाने शेतकरी 'हायटेक' झाल्यास उत्पादन खर्च २५ टक्क्यांनी कमी होईल, असा विश्वास राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत व्यक्त केला.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसंदर्भातील लक्षवेधीची सूचना अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत मांडली होती. यानंतर चर्चेतून अनेक उपप्रश्न पुढे आल्यानंतर मुंडे यांनी फवारणीसाठी 'ड्रोन' चा पर्याय पुढे आणला. अलीकडे शेती व्यवसायात मनुष्यबळाचा अभाव आहे. तर यंत्र युगात अत्याधुनिक पद्धतीने शेतकऱ्यांचे कष्ट कमी होऊन कमी कालावधीत अधिकच उत्पन्न शक्य आहे.

यासाठी केंद्र शासनाकडून 'एसओपी' अर्थात स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (प्रमाणित कार्यपद्धती) तयार करण्यासाठी मार्गदर्शन घेण्यात येईल. त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर ड्रोन पायलट अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण वर्ग चालविता येतील.

जेणेकरून शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल. शेतकऱ्यांच्या मुलांनाही या ड्रोन पायलट, तसेच मेकॅनिकल अभ्यासक्रमाचा फायदा होईल. सोबतच शेतमालासाठी मार्केट लिंक तयार मिळाल्यास कृषी क्रांती शक्य असल्याचा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला.

मधमाशीपालनासह शेती फायद्याची

मधमाशी शेतीसाठी विविध प्रकारे नियोजन करावे लागत असते. कृषी विभागाच्या भाषेत ५० पेटींची शेती करावी लागते. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत ३६२ शेतकऱ्यांनी मधुमक्षी पालन व्यवसाय केले. ५कोटी २३लाखांचे अनुदान त्यांना मिळाले. येणाऱ्या काळात येथे उष्णतेचे प्रमाणाकडे लक्ष देता येईल, मधुमाशांना मुबलक अन्न मिळावे याकडे लक्ष देता येईल. एकूणच कृषी विभागाकडून मजबूत यंत्रणा उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे मुंडे म्हणाले.

लोकशाही दिनाला कृषी अधिकारी हवेत !

जिल्हाधिकारी कार्यालयात दरमहा लोकशाही दिन पाळला जातो. त्या ठिकाणी विविध विभागाचे अधिकारी असतात. त्या दिवशी कृषी अधिकारी उपस्थित राहिल्यास अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी दूर करता येणे शक्य आहे, अशी सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोन्हे यांनी केली. यावर जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या समस्या सोडविण्यासाठी याचा विचार करता येईल, असेही मुंडे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: १९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील अवकाळीच्या नुकसानीपोटी १६४ कोटी मदत मंजूर

Summer Moong Sowing: खानदेशात उन्हाळ मूग पेरणीला प्रतिसाद

Sugar Export Ban: साखर निर्यात बंदी म्‍हणजे शेतकऱ्यांची लूट : अशोकराव थोरात

Swachhta Hi Seva Campaign: ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा ५०० वा टप्पा साजरा

Villages Flood Risk: अहिल्यानगर जिल्ह्यातील २२३ गावे पुराच्या धोक्यात

SCROLL FOR NEXT