Soybean Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Procurement : हमीभावाने ११ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी

Soybean MSP : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत हमीभावाने (प्रतिक्विंटल ४८९२ रुपये) परभणी व हिंगोली जिल्ह्यातील १५ केंद्रांवर मंगळवारपर्यंत (ता. १२) ६५३ शेतकऱ्यांच्या ११ हजार ४०९ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे.

Team Agrowon

Parbhani News : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत हमीभावाने (प्रतिक्विंटल ४८९२ रुपये) परभणी व हिंगोली जिल्ह्यातील १५ केंद्रांवर मंगळवारपर्यंत (ता. १२) ६५३ शेतकऱ्यांच्या ११ हजार ४०९ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे.

या दोन जिल्ह्यांत हमीभाव सोयाबीन खरेदी केंद्रांची संख्या २३ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यापैकी २१ केंद्रांवर १३ हजार २०१ शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी दिली.

किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात राज्य सहकरी पणन महासंघ व केंद्रीय नोडल एजन्सी राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ (नाफेड) यांच्यातर्फे सोयाबीन खरेदीसाठी १ ऑक्टोबरपासून शेतकरी नोंदणी तर मंगळवारपासून (ता. १५) सोयाबीन खरेदी सुरू झाली आहे.

परभणी, पेडगाव, जिंतूर, बोरी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या ९ खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी मंगळवारअखेर (ता. १२) ८ हजार २३४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. खरेदी केंद्रांवर सोयाबीन घेऊन येण्यासाठी १ हजार ८१४ शेतकऱ्यांना संदेश पाठविण्यात आले. परभणी, पेडगाव, बोरी, सेलू, सोनपेठ, पूर्णा या ६ खरेदी केंद्रांवर ३०८ शेतकऱ्यांचे ५ हजार २७५.८८ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले.

हिंगोली जिल्ह्यात राज्य सहकारी पणन महासंघ व केंद्रीय नोडल एजन्सी राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) यांच्यातर्फे सोयाबीन खरेदीसाठी हिंगोली, कन्हेरगाव, कळमनुरी, वारंगा, वसमत, जवळा बाजार, येळेगाव, सेनगाव, साखरा, शिवणी खुर्द, फाळेगाव, नागासिनगी, आडगाव, उमरा ही १४ केंद्रे आहेत. यापैकी १२ केंद्रांवर मंगळवारपर्यंत (ता. १२) ४ हजार ९६७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्रीस आणण्यासाठी २ हजार २९८ शेतकऱ्यांना संदेश पाठविण्यात आले. एकूण ९ केंद्रांवर ३४५ शेतकऱ्यांचे ६ हजार १३४ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले. केंद्र शासनाने हमीभावाने खरेदीसाठी सोयाबीनमधील ओलाव्याची मर्यादा १५ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हमीभावाने सोयाबीन खरेदीमध्ये वेग येऊ शकतो. त्याबाबतचे आदेश केंद्र चालकांना प्राप्त झाले नव्हते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

Maharashtra Winter Weather : किमान तापमानात चढ-उतार शक्य

SCROLL FOR NEXT