Garlands Agrowon
ॲग्रो विशेष

Silk Cocoon Garlands: बीडच्या प्रियंका फाटे यांचा अनोखा प्रयोग; टाकाऊ कोषापासून शोभिवंत हार!

Success Story: राज्यात रेशीम शेतीला वेग मिळत असताना, काही वेळा टाकाऊ कोषांची समस्या निर्माण होते. मात्र, बीडच्या प्रियंका फाटे यांनी या टाकाऊ कोषापासून शोभिवंत हार व बुके तयार करून नवीन बाजारपेठ निर्माण केली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News: राज्यात रेशीम शेतीचा विस्तार वाढता असतानाच काही वेळा कोषाची प्रत अपेक्षित मिळत नाही. मात्र याच टाकाऊ कोषापासून बुके आणि हार तयार करीत त्यापासून चांगले उत्पन्न मिळविण्यात अमरावती, सातारा, कोल्हापूर आणि बीडचे शेतकरी यशस्वी झाले आहेत.

राज्यात रेशीम शेतीचा विस्तार वाढता आहे. सध्या चांगल्या दर्जाच्या कोषाला ७२० ते ७३० रुपये किलोचा दर मिळत आहे. मात्र अनेकदा काही कारणांमुळे डागी, पोचट, डब्बल अशाप्रकारचा कमी प्रतीचा कोष राहतो. याला बाजारात मागणी राहत नाही. त्यामुळे ७० ते १०० रुपये किलोने हा विकावा लागतो. याच टाकाऊ कोषापासून शोभीवंत हार आणि बुके तयार करीत त्याला बाजारपेठ मिळविण्यात शेतकरी यशस्वी झाले आहेत.

काकरवाडी (माजलगाव, बीड) प्रियंका शिवराज फाटे (पवार) यांनी २०२३ मध्ये पहिल्यांदा टाकाऊ कोषापासून हार, बुके तयार केले. दीड ते दोन किलो कोषाचा वापर करून तयार केलेल्या हाराची किंमत २५०० रुपये आहे. कोषाला रंग द्यायचा सोबतच लाकडी शोभीवंत मण्यांचा वापर देखील यात होतो, असे प्रियंकाचे वडील शिवराज सांगतात. महालक्ष्मी तसेच दिवाळी काळात याला मागणी राहते.

एकदा हा हार घेतल्यास २५ वर्षांपेक्षा अधिक काळ तो टिकतो. विक्रीकरिता सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात आला. त्यातूनच पुणे, मुंबई, हैदराबाद या भागातून कोष हाराला मागणी वाढली. तत्कालीन कृषिमंत्री अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे यांच्या स्वागतासाठी या हारांचा वापर झाला.

२०११ पासून रेशीम शेती करतो. एकदा लॉट खराब निघाला तो कोष फेकून देण्यासाठी शेतात आणला. त्या वेळी मुलगी प्रियंकाने उत्सुकतेने त्यावर प्रयोग सुरू केले. त्यातूनच टाकाऊ कोषापासून हार, बुकेची संकल्पना पुढे आली. रेशीम उपसंचालक महेंद्र ढवळे, जिल्हा रेशीम अधिकारी विनीत पवार यांच्या पुढाकारातून या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध झाली. रेशीम शेतीतील सातत्याबद्दल २०२४ मध्ये रेशीमरत्न पुरस्कार मिळाला.
शिवराज फाटे, रेशीम उत्पादक, बीड ( ९७६७५२२२०७)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop Insurance Compensation: सोयाबीन विम्याचे ११४६ कोटी मंजूर

Sugar Production Rises: साखर उत्पादनात सात टक्क्यांनी वाढ

Maha Annapurna Project: भात शेतीच्या कायापालटासाठी ‘महाअन्नपूर्णा प्रकल्प’

Drip Vendor Registration Issues: ठिबक विक्रेता नोंदणी रखडली

Vidarbha Heatwave: विदर्भात उष्ण लाटेची शक्यता

SCROLL FOR NEXT