Agriculture Festival Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Festival : जिल्हा कृषी महोत्सवासाठी प्राधान्याने नियोजन करा

Nagar Agriculture Festival : कृषिविषयक विकसित तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी यंदाही नगर येथे जिल्हा कृषी महोत्सव घेतला जाणार आहे.

Team Agrowon

Nagar News : कृषिविषयक विकसित तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी यंदाही नगर येथे जिल्हा कृषी महोत्सव घेतला जाणार आहे. हा महोत्सव शेतकऱ्यांसाठी प्रभावी ठरावा म्हणून महोत्सवाचे प्राधान्याने नियोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे.

यंदाही गेल्या वर्षी प्रमाणेच सर्व विभागाचा मिळून एकत्रित कृषी महोत्सव होणार असून त्याबाबत बैठकीत चर्चा झाली. आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कृषी महोत्सवाला अधिक महत्त्व असेल.

जिल्हा कृषी महोत्सव व अन्य काही बाबीच्या अनुषंगाने गुरुवारी (ता. २८) जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मा नियामक मंडळाची बैठक झाली. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक विलास नलगे, उपसंचालक राजाराम गायकवाड यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, की कृषिविषयक नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडावी यादृष्टीने सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीमालास योग्य भाव मिळावा,

ग्राहकांना उच्च दर्जाचा शेतीमाल मिळावा यासाठी शेतकरी ते ग्राहक थेट विक्री शृखंला विकसित करणे, कृषिविषयक परिसंवाद, व्याख्यानाद्वारे विचारांच्या देवाण-घेवाणीद्वारे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण, विक्रेता-खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजाराभिमुख कृषी उत्पादनास आणि विपणनास चालना देणे यातून शक्य होणार आहे.

शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर सत्र

जिल्ह्यात ऊस उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा अधिक कल दिसून येतो. ऊस उत्पादनासाठी अधिक प्रमाणात पाण्याचा वापर होत असल्याने कमी पाण्यात व कमी खतामध्ये अधिक ऊस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन करण्यात यावे.

जीडीपी दर वृद्धीमध्ये कृषी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राच्या विस्तारासाठी विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पीकपेरणी, पीकविमा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, कोरडवाहू क्षेत्र कार्यक्रम यासह इतर योजनांचा व्यापक स्वरूपात आढावा घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात कर्जमाफीचे ५ हजार ८६ कोटी रुपये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जखात्यावर वितरीत

Wild Vegetable Conservation: रानभाज्यांच्या बियाणे बँकेसाठी प्रयत्न करा : प्रसाद

Fake Agricultural Products: नामवंत कंपनीच्या नावाने बनावट पोषकविक्री रॅकेटचा पर्दाफाश

Agrowon Podcast: तुरीच्या दरात चढ-उतार, हळदीच्या भावात बदल, वांगी दरात घसरण, पालकचे भाव टिकून तर संत्री दरात वाढ

International Agriculture Workshop: युवा शेतकरी प्रताप मारोडे यांची आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी निवड

SCROLL FOR NEXT