Flood Affected Sugarcane agrowon
ॲग्रो विशेष

Flood Affected Sugarcane : पूरबाधित ऊस तोडणीला अग्रक्रम द्या; शेतकऱ्यांतून मागणी, वजन घटून नुकसान

Farmers Loss Flood : पूरबाधित उसाचे वाडे कुजले असून उसाला ठिसल्या फुटू लागल्या आहेत. यामुळे ऊस वाळू लागला आहे. परिणामी उरल्यासुरल्या उसाचे वजन घटून नुकसान होऊ लागले आहे.

sandeep Shirguppe

Flood Affected Sugarcane Kolhapur : यंदा जुलै महिन्यातील महापुरात नदीकाठच्या उसाचे प्रचंड नुकसान झाले. पूरबाधित उसाचे वाडे कुजले असून उसाला ठिसल्या फुटू लागल्या आहेत. यामुळे ऊस वाळू लागला आहे. परिणामी उरल्यासुरल्या उसाचे वजन घटून नुकसान होऊ लागले आहे. याबाबत साखर कारखान्यांनी पूरबाधित उसाच्या तोडणीला अग्रक्रम द्यावा. तसेच लवकरात लवकर पूरबाधित उसाची उचल करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

यंदा उन्हाळ्यात वळीव पाऊस चांगला झाल्याने ऊस जोमदार आला होता. मात्र जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांना महापूर आला. महापुरात नदीकाठावरील पिके तीन आठवडे पाण्याखाली जाऊन पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये प्रामुख्याने उसाचे वाडे कुजून नुकसान झाले आहे.

पूरबाधित उसाला ठिसली फुटली असून उरलासुरला ऊस वाळून उसाची खोडवी होऊ लागली आहेत. तसेच वजनात घट होऊ लागली आहे. महापुरात अगोदरच शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. आता ऊस वाळून अधिकच नुकसान होऊ लागले आहे. असा पूरबाधित ऊस तोडायला ऊसतोडणी मजूर नकार देत आहे. गळीत हंगाम सुरू झाला असून साखर कारखाना प्रशासनाने पूरबाधित उसाच्या तोडणीला अग्रक्रम द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

यंदा कासारी नदीच्या महापुरात उसाचे प्रचंड नुकसान झाले आहे. उसाचे वाडे कुजल्यामुळे ढिस येऊन उरलासुरला ऊस वाळू लागला आहे. पूरबाधित उसाची लवकरात लवकर विल्हेवाट लावून मका किंवा सूर्यफूल घेण्याचे नियोजन आहे. त्यासाठी साखर कारखान्यांनी ऊस लवकरच गाळपाला नेणे गरजेचे असल्याचे पन्हाळा तालुक्यातील वाघवे गावचे पूरग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितलं.

शिरोळ तालुक्याची दयनीय अवस्था

जिल्ह्यात सर्वाधिक पूरबाधित गावे शिरोळ तालुक्यात होत असतात. यंदा सुमारे ४३ गावातील पिके पाण्याखाली गेल्याने शिरोळ तालुक्यातील ऊस आणि भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नदी किनाऱ्याला असलेल्या पिकांना सध्या पाण्याची गरज आहे परंतु अद्यापही काही ठिकाणी कृषी पंप बंद असल्याने ऊस वाळून जात आहे. तर काही ठिकाणी अद्यापही शेतात ओलावा असल्याने ऊस तोडणीस विलंब होत असल्याने मोठे नुकसान होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT