Onion Garlic Rate agrowon
ॲग्रो विशेष

Onion Garlic Rate : कोल्हापूर बाजारात कांदा, लसूण, शेवगा शेंग दरात तेजी; टोमॅटोची झाली घसरण

Garlic Rate : गवारीचे उत्पादन कमी होत असल्याने जवारी आणि देशी गवारीला १०० रूपयांच्या पुढे दर मिळत आहे. लाल कांदा ५० रुपये आणि उन्हाळी कांदा ७० रुपये असा, तर बटाटा ४० ते ५५ रुपये प्रतिकिलो आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Vegetables Rate : मागील एक वर्षापासून लसणाचे दर ३०० ते ४०० रूपयांपर्यंत स्थीर राहिले आहेत. तर ठेवणीतील कांद्यांची आवक कमी झाल्याने कोल्हापूर बाजारात कांद्याच्या दरात तेजी पहायला मिळत आहे. तर शेवगा शेंग प्रतीनग वीस रुपये आहे, तर मेथी, पोकळा, कांदापात, शेपूचा दर प्रती पेंडी वीस ते पंचवीस रुपये असा आहे.

आवळा, ओली हळद, गावठी काकडीची काही प्रमाणात बाजारात आवक वाढली असली तरी दर चांगला मिळत आहे. गवारीचे उत्पादन कमी होत असल्याने जवारी आणि देशी गवारीला १०० रूपयांच्या पुढे दर मिळत आहे. लाल कांदा ५० रुपये आणि उन्हाळी कांदा ७० रुपये असा, तर बटाटा ४० ते ५५ रुपये प्रतिकिलो आहे.

बाजारात नवीन लसूण न आल्याने जुन्या लसणाला दर आला आहे. किरकोळ बाजारात लसणाचा दर ३६० ते ४२० असा आहे. अजून नवीन कांदा दाखल झालेला नाही. पालेभाज्या, फळभाज्या आणि फळांमध्ये पेरू, संत्री, मोसंबी, सफरचंदचे दर कमी झाले आहेत, तर डाळिंब, परदेशी सफरचंद, अंजीरला दर चांगला मिळत आहे. केळीचे दर स्थिर आहेत. टोमॅटोचा भाव खाली आला आहे.

भाजीपाला दर किलोमध्ये रूपयांत

मेथी १५ ते २५, कांदापात २०, शेपू २०, पालक १५ ते २०, पोकळा १५ ते २०, तांदळी १५, लाल माठ १० ते १५, पुदीना १० ते २०, मुळा १० ते १५ नग, कोथिंबीर १५ ते २५.

फळभाज्यांचे किलोचे दर

दोडका ४० ते ६०, वांगी ४० ते ८०, ढब्बू मिरची ६० ते १००, गवारी १०० ते १४०, बिनीस १०० ते १२०, घेवडा ८० ते १००, हिरवी काकडी (गावठी) १२०, काटेरी काकडी ४० ते ६०, पडवळ १५ ते २५ नग, शेवगा १५ ते २० नग. दुधी भोपळा २० ते ४० नग. टोमॅटो ३० ते ४०, ओली मिरची ५० ते ६०, बीट १५ते २० रूपये नग. हिरवा वाटाणा १४०, कोबी २० ते ४०, फ्लॉवर गड्डा ३० ते ५० रूपये.

फळांचे दर

सफरचंद १२० ते १८०, सफरचंद (परदेशी) १८० ते २९०, डाळिंब १००, सीताफळ ५० ते ६०, पेरू ५० ते ६०, पपई १० ते ५०, केळी जवारी ४० ते ७०, केळी बंदरी ४० ते ८०, ड्रॅगन फ्रुट १२०, अंजीर १२० ते १४०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

Sericulture Farming : पावसाने इतर पिकं गेली, तुती-रेशीम ठरलं आधार; ४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न | Agrowon

Veterinary Staff Shortage: राधानगरीत रिक्त पदांमुळे जनावरांच्या उपचारात अडचणी

Rain Deficit Impact: पावसाने केळी लागवडीला ‘ब्रेक’

Akola Farmer Loan Waiver: अकोला जिल्ह्यातील ११ हजार ५० शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT