Market Committee Kolhapur : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ९० कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या बदल्या मागच्या २ आठवड्यांपूर्वी करण्यात आल्या होत्या. मात्र, अवघ्या काही दिवसांत या बदल्या रद्द करण्याची नामुष्की बाजार समिती प्रशासनावर आली आहे. याबाबत बाजार समितीचे सचिव जयवंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बदल्या रद्द झाल्या आहेत, एवढेच सांगून बोलणे टाळले.
अकाउंटंट असलेल्या एका अधिकाऱ्याने बदली स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली. त्यासाठी वारणाकाठच्या जनशक्ती असलेल्या एका वजनदार नेत्याने एका अकाउंटंटची बदली वाचविण्यासाठी प्रशासकीय कामकाजाचा भाग असणाऱ्या ९० जणांची बदली रद्द करण्यासाठी निर्णायक प्रयत्न केले. त्याला यश आले आणि बाजार समितीतील त्या ९० बदल्या रद्द झाल्याचा आदेश निघाला. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा वचर्स्ववादावरून राजकारणात धुमाकूळ माजण्याची शक्यता आहे.
एका अकाउंटंटची बदली वाचवण्यासाठी बदलीची नियमावलीच बस्तानात गुंडाळून ठेवण्याचा बाजार समितीत नवा इतिहास उदयास आला. शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये सुमारे १२ विभाग आहेत. यात शेतीमाल सौदे व्यवहारचे ६, तर प्रशासकीय ५ व अन्य २ अशा विभागांत जवळपास ९५ कर्मचारी काम करतात. तर ७ अधिकारी काम करतात.
प्रशासकीय कामकाजाचा भाग म्हणून १५ दिवसांपूर्वी या सर्वांच्या बदल्या झाल्या होत्या. सर्व कर्मचारी व अधिकारी बदली झालेल्या विभागात काम करू लागले. मात्र, अकाउंटंट असलेल्या एकाने हट्टाने मी ही बदली स्वीकारणार नाही, असाच पवित्रा घेतला. यावर बदली स्वीकारलेले सर्व कर्मचारी नाराज झाले. त्यांनीही प्रशासनाला निवेदन दिले की, अकाउंटंट यांचीही बदली करावी. अन्यथा, आम्ही पूर्वीच्याच पदावर काम करतो.
सभापती, सचिव अशा अधिकाऱ्यांनीही संबंधित अकाउंटंटची समजूत काढून बदली स्वीकारावी, असे सूचित केले. मात्र, अखेरपर्यंत अकाउंटंटने बदली स्वीकारली नाही. कहर असा की, वारणेकडील एका नेत्याचा विश्वासू म्हणून हा अधिकारी ओळखला जातो. बाजार समितीच्या आर्थिक हिशोबांचा अकाउंटंट हा विभाग आहे.
इथे अनेक अंगाने लाभदायक काम असल्याने संबंधित अकाउंटंट या विभागातील आपला अधिकार सोडण्यास तयार नाही, अशी चर्चा आहे. सभापती, सचिव व संचालकांनी मान्यतेनेच बदल्या केल्या होत्या. मात्र, एका अकाउंटंटची मर्जी राखण्यासाठी ९० जणांच्या बदल्या केल्या गेल्या. याबाबत बाजार समितीचे सचिव जयवंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बदल्या रद्द झाल्या आहेत, एवढेच सांगून सविस्तर बोलणे टाळले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.