Agrowon Exhibition Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Exhibition : ‘अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनाची जय्यत तयारी

Agriculture Exhibition : ‘सकाळ-अॅग्रोवन’कडून ११ ते १४ जानेवारी दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे होत असलेल्या ‘अॅग्री एक्स्पो २४’ कृषी प्रदर्शनाची जय्यत तयारी सुरू आहे.

Team Agrowon

Pune News : ‘सकाळ-अॅग्रोवन’कडून ११ ते १४ जानेवारी दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे होत असलेल्या ‘अॅग्री एक्स्पो २४’ कृषी प्रदर्शनाची जय्यत तयारी सुरू आहे. या भव्य प्रदर्शनातून बागायती, कोरडवाहू तसेच संरक्षित शेतीमधील समस्यांवर नवनवीन माहिती व तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांना प्रभावी उपाय मिळणार आहेत.

दुष्काळाची लढा देण्यासाठी शेतकऱ्यांना बळ मिळवून देणारे, शेतीसंबंधी विविध विषयांवर तज्ज्ञ व शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन घडवून आणणारे हे अनोखे प्रदर्शन असेल. प्रयोगशील शेतीतून आदर्श निर्माण करणाऱ्या राज्यातील युवा शेतकऱ्यांना या प्रदर्शनात निमंत्रित करण्यात आलेले आहे.

त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय ‘अॅग्रोवन’ने घेतला आहे. चार दिवसांच्या या भरगच्च प्रदर्शनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना इतर प्रयोगशील शेतकऱ्यांना भेटता येईल. याशिवाय संस्थांचे प्रतिनिधी, कृषी खात्यातील अधिकारी, शास्त्रज्ञ, संशोधक तसेच अभ्यासकांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करण्याची संधीही प्रदर्शनामुळे लाभेल.

छत्रपती संभाजीनगर येथील जालना रस्त्यावरील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या मैदानावर (केंब्रिज स्कूलजवळ) हे भव्य प्रदर्शन भरणार आहे. यंदाच्या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक जी. के. एनर्जी सोलर पंप असून, इकोजेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स बी. जी. चितळे डेअरी (भिलवडी, सांगली), इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (इफ्को) तसेच कृषी विभाग-महाराष्ट्र राज्य व आत्मा विभागाच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन होत आहे.

समूह शेती धोरणाला ‘अॅग्रोवन’कडून सतत प्रोत्साहन दिले जात असते. त्यामुळेच राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीसी) या प्रदर्शनात विशेष महत्त्व दिले जात आहे. यंदा‘ एफपीसीं’चे स्वतंत्र स्टॉल्स बघण्यास मिळणार आहेत.

या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन संस्था, नामवंत बॅंका, कृषी शिक्षण संस्था, बियाणे, खते, कीटकनाशके, हरितगृह उभारणी, यंत्रे व अवजारे क्षेत्रातील कंपन्यांची तयारी सुरू आहे.

या सर्व कंपन्यांची दालने शेतकऱ्यांना बघता येतील. याशिवाय ट्रॅक्टर, पीक काढणी व कापणी यंत्रे, प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग, कोल्ड स्टोअर उद्योग, टिश्यू कल्चर, ठिबक व तुषार सिंचन उद्योगातील नामवंत कंपन्यादेखील प्रदर्शनात सहभागी होत आहेत.

मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांतील प्रयोगशील शेतकऱ्यांमध्ये या प्रदर्शनाबाबत असलेली उत्सुकता शिगेला गेली आहे. शेतीमधील समस्यांशी लढण्याचे बळ देणाऱ्या ‘अॅग्रोवन’च्या प्रदर्शनाला गेल्या वर्षी लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी भेट दिली होती.

‘लढा दुष्काळाशी’वर स्वतंत्र दालन

दुष्काळी स्थितीत अनेक समस्यांना तोंड देत कष्टाने शेती फुलविणाऱ्या विविध शेतकऱ्यांच्या यशकथांचे स्वतंत्र दालनच यंदा अॅग्रोवन प्रदर्शनात उपलब्ध असेल. तेथे शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर वाचनीय माहिती मिळेल; याशिवाय काही उपायांवर मार्गदर्शनदेखील होईल. मराठवाड्यातील बहुतेक तालुके सध्या दुष्काळाच्या तडाख्यात सापडलेले आहेत. या विशेष दालनामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाशी सामना करण्याचे बळ मिळेल.

‘लकी ड्रा’द्वारे मिळणार ट्रॅक्टर

‘अॅग्रोवन’च्या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या एका शेतकऱ्याला ‘लकी ड्रा’द्वारे यंदा ट्रॅक्टरची भेट मिळेल. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी प्रदर्शनस्थळी येताच आधी नोंदणी अर्ज घ्यावा व त्यात सविस्तर माहिती, भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करावा. शेजारच्या ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये नोंदणी अर्ज टाकावा. प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी (ता. १४) दुपारी तीन वाजता ‘लकी ड्रॉ’द्वारे विजेता निवडला जाईल.

थोडक्यात महत्त्वाचे...

> ११ जानेवारीपासून छत्रपती संभाजीनगर गजबजणार

> कृषी शास्त्रज्ञ, संशोधक, अधिकाऱ्यांना भेटण्याची संधी

> शेती समस्यांवर तंत्रज्ञानाद्वारे मिळणार नवे उपाय

> नामवंत कंपन्या, बॅंका, संस्थांची दालने भेटीला

> शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी स्वतंत्र स्टॉल्स

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

SCROLL FOR NEXT