Shaktipeeth Highway Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ मार्गाविरोधात सिंधुदुर्गात आंदोलनाची तयारी

Farmer Protest Update: शक्तिपीठ मार्गाविरोधात सिंधुदुर्गातील शेतकरी आंदोलनाची तयारी करू लागले असून, आंबोली (ता. सावंतवाडी) ग्रामस्थ एकवटले आहेत. त्यामुळे येत्या काळात या मार्गाविरोधात आंदोलन उभे राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

एकनाथ पवार / ॲग्रोवन वृत्तसेवा

Sindhudurg News: शक्तिपीठ मार्गाविरोधात सिंधुदुर्गातील शेतकरी आंदोलनाची तयारी करू लागले असून, आंबोली (ता. सावंतवाडी) ग्रामस्थ एकवटले आहेत. त्यामुळे येत्या काळात या मार्गाविरोधात आंदोलन उभे राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

नियोजित शक्तिपीठ मार्गाविरोधात कोल्हापूर, सांगलीसह विविध भागांत आंदोलने झाली आहेत. मात्र आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्याही हालचाली दिसून येत नव्हत्या. परंतु आता या मार्गाविरोधात आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. नागपूर ते गोवा असा हा शक्तिपीठ मार्ग होत असून कोल्हापूर जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा महामार्गाचा प्रवेश होणार आहे.

हा महामार्ग गेळे, आंबोली, पारपोली, वेर्ले, उडेली, फणसवडे, घारपी, फुकेरी, तांबोळी, डेगवे, बांदा या गावांतून जात आहे. या महामार्गावरील आंबोलीतील शेतकऱ्यांनी महामार्गास विरोध करण्यास सुरुवात केली आहे.

येथील शेतकऱ्यांची एक बैठक देखील झाली. या बैठकीत शेतकऱ्यांनी सुरुवातीला येथील कबुलायतदार गावकर प्रश्न सोडवावा त्यांनी शक्तिपीठ महामार्गाचा विचार करावा. जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आमचा विरोध कायम राहणार आहे. काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गातील महामार्गाचा सर्व्हेक्षण करण्यात आले असून हद्द निश्‍चित करण्यात आली आहे. त्यामुळे विश्‍वासात न घेता ही हद्द निश्‍चित केली असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून सुरू आहे.

कबुलायतदार गावकर प्रश्‍न गेले २५ वर्षे सुटलेला नाही. येथील वन जमिनी शक्तिपीठ मार्गात गेल्यास हा प्रश्न आणखी गुंतागुंतीचा होणार आहे. त्यामुळे जोपर्यंत हा प्रश्‍न सुटत नाही तोपर्यंत आम्ही शक्तिपीठ मार्ग होऊ देणार नाही. शासनाने पहिला आमचा प्रश्‍न सोडवावा.
शशिकांत गावडे, अध्यक्ष, कबुलायतदार गावकर संघर्ष समिती
शक्तिपीठ मार्ग पूर्णतः जंगलातून जात असल्यामुळे येथील वनसंपदेचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे आमचा या महामार्गाला विरोध आहे.
सत्यवान गावडे, आंबोली, स्थानिक ग्रामस्थ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Treatment Services: जनावरांचे दवाखाने दोन सत्रांत उघडणार

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेचे अडीच लाख लाभार्थी

Satara Agriculture Exhibition: ‘कृषी’च्या विभागीय प्रदर्शनात ३.२५ कोटींचे करार

Agriculture Sales Center: शेती उत्पादनासाठी वसईला विक्री केंद्र उभारणार

Unseasonal Rain Impact: अवकाळी पावसात कांदा पिकाची काळजी कशी घ्याल?

SCROLL FOR NEXT