Sugarcane Crushing  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : पाच साखर कारखान्यांकडून खानदेशात गाळपाची तयारी

Sugarcane Farming : पुढील महिन्यात ऊस तोडणी सुरू होईल, अशी स्थिती असून, तोडणीची तयारी पूर्ण झाल्याचे दिसत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जळगाव ः खानदेशात उसाखालील क्षेत्र स्थिर आहे. परंतु यंदा ऊस तोडणी निवडणुकीच्या धामधुमीत लांबली आहे. आता पुढील महिन्यात ऊस तोडणी सुरू होईल, अशी स्थिती असून, तोडणीची तयारी पूर्ण झाल्याचे दिसत आहे.

नंदुरबार जिल्ह्यात उसाची १४ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. खानदेशात ऑक्टोबरच्या अखेरीस साखर कारखाने सुरू होतील, असे संकेत होते. परंतु दिवाळी व लागलीच विधानसभा निवडणूक अशी लगबग सुरू झाली. यात गाळप हंगाम लांबला. पण कारखाने डिसेंबरच्या सुरुवातीला सुरू होणार आहेत. यामुळे गाळपासंबंधी कार्यवाही गती घेईल. तसेच गाळप सर्व क्षेत्रांतील उसाचे होईल, असे दिसत आहे. मागील हंगामातही गाळप वेगात झाले होते.

मध्यंतरी खानदेशातील ऊस लागवड १५ हजार हेक्टरवर खाली आली होती. परंतु मागील तीन वर्षांत उसाखालील क्षेत्रात वाढ झाली. जळगाव जिल्ह्यात मागील हंगामातही १२ हजार हेक्टरवर ऊस पीक होते. यंदाही १२ हजार हेक्टरवर जळगावात ऊस आहे. धुळे जिल्ह्यात चार हजार हेक्टरवर ऊस आहे. यात साक्री व शिरपूर तालुक्यांत ऊसलागवड अधिक आहे.

नंदुरबारमध्ये १४ हजार हेक्टरवर ऊस असून, शहादा, तळोदा व नवापूर तालुक्यांत ऊस पीक अधिक आहे. नंदुरबार जिल्ह्यात तीन साखर कारखाने सुरू होणार आहेत. यातील समशेरपूर (ता. नंदुरबार) येथील कारखाना गाळपात आघाडी घेतो. या कारखान्याने सर्वाधिक ऊस गाळप मागील हंगामात केले आहे. जळगाव जिल्ह्यात दोन साखर कारखाने सुरू होणार आहेत. त्यात घोडसगाव (ता. मुक्ताईनगर), चहार्डी (ता. चोपडा) हे कारखाने सुरू होणार आहेत.

नंदुरबारमध्ये डोकारे (ता. नवापूर), समशेरपूर (ता. नंदुरबार), पुरुषोत्तमनगर (ता. शहादा) हे कारखाने सुरू होणार आहेत. तसेच तळोदा तालुक्यात एक खांडसरी सुरू होईल. पुढेही खानदेशात १०० टक्के उसाचे गाळप होईल, असे चित्र आहे. यामुळे ऊस लागवड स्थिर आहे. काही भागांत ऊसलागवड कमी झाली आहे. परंतु काही भागांत ऊसलागवड वाढली आहे. यामुळे क्षेत्र स्थिर आहे.

जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, भडगाव भागात ऊसलागवड किंचित वाढली आहे. यावल भागातही ऊसलागवड किंचित वाढली आहे. पण चोपडा भागात ऊस कमी आहे. धुळ्यातील शिरपुरातही ऊसलागवड किंचित वाढली आहे. परंतु धुळे तालुक्यातील क्षेत्र कमी झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यात पाच हजार हेक्टरवर लागवड आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT