Solapur News : करमाळा तालुक्यातील शेतीत सातत्याने वेगवेगळे प्रयोग केले जातात. त्यातीलच एक प्रयोग म्हणजे सात ते आठ वर्षांपासून सुरू असलेली बांबू लागवड. तालुक्यातील मांगी, वाशिंबे, कोर्टी, झरे, साडे, पिंपळवाडी या गावांमधील शेतकऱ्यांनी एकत्रित येत बांबू शेती केली आहे.
करमाळा तालुक्यात आदर्श पद्धतीने ऊस, केळी शेती केली जाते. आता शेतकरी बांबू लागवड देखील करू लागले आहेत. लागवडीनंतर तिसऱ्या वर्षी बांबू उत्पादनाला सुरवात होत असून एकरी दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न मिळू लागले आहे. बांबू शेती भविष्यात फायद्याची असल्याने झरे येथील सेवानिवृत्त जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब पाटील यांनी दहा वर्षांपासून करमाळा तालुक्यात जनजागृती करण्याचे काम केले आहे.
त्यांनी सुरवातीला स्वतःच्या शेतात बांबू लागवड केली. त्यांच्या पाठोपाठ करमाळा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी बांबूलागवड केली आहे. बांबूच्या भरीव, पोकळ, जाड, हिरवा व पिवळ्या बांबूच्या प्रजाती आहेत. जगात बांबूच्या १५०० आणि भारतात १३४ जाती आहेत. महाराष्ट्रात माणगा, मानवेल, बलकोआ, तुलडा, कटांग, बोर, आलिवरी, अस्पर, न्यूटन या जातीची शिफारस केली आहे. रोपे बियांपासून व उतिसंवर्धानाद्वारे (टिशु कल्चर) तयार केली जातात. टिकरमाळा तालुक्यात बांबू लागवड केलेली शेतकरी
बाळासाहेब विलासराव पाटील (झरे), निलकंठ किसन अभंग (कोर्टी), आशुतोष सुजित बागल (मांगी), संतोष घाडगे पाटील (झरे), संभाजी शिवाजी बागल (मांगी), बापू काळे (पिंपळवाडी), आकाश लुणिया (मांगी), संतोष मस्तूद (साडे), प्रवीण गोमे (साडे), महादेव बोबडे (वाशिंबे), भारत शेंडे (घोटी) प्रभाकर कांबळे (झरे)
सलग ५० वर्षे उत्पन्न
एकदा बांबू लागवड केली की ५ व्या वर्षांपासून पक्व बांबूंची तोडणी केली जाते. बांबूचे आयुष्य मान ४० ते ५० वर्षे आहे, त्यामुळे ते रोप ५० वर्षे सलग उत्पन्न देते. दुष्काळी भागासाठी म्हणजेच आपल्या सोलापूर जिल्ह्यासाठी मानवेल ही कमी पाण्यावर तग धरणारी भरीव बांबूची जात आहे. करमाळा तालुक्यात मानवेल या जातीच्या बांबूची लागवड करण्यात आली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.