Water Resource  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Testing : अनेक गावे धोक्याच्या उंबरठ्यावर

Water Contamination : मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली असून ग्रामीण भागात साथीच्या तसेच जलजन्य आजारांचा धोकासुद्धा वाढणाार आहे.

Team Agrowon

Amaravati News : मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली असून ग्रामीण भागात साथीच्या तसेच जलजन्य आजारांचा धोकासुद्धा वाढणाार आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या मॉन्सनपूर्व पाणी तपासणीत अनेक गावे धोक्याच्या उंबरठ्यावर असल्याची माहिती समोर आली आहे.

सुदैवाने तूर्तास एकाच ग्रामपंचायतीला रेडकार्ड असून ती ग्रामपंचायत तीव्र जोखीम असलेल्या गटात मोडते, तर १३१० जलस्रोतांचा अहवाल मध्यम जोखीम असलेल्या गटात मोडत असल्याने आरोग्य विभाग तसेच ग्रामपंचायतींना विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

अचलपूर तालुक्यातील शिंदी बु. या ग्रामपंचायतीला रेडकार्ड देण्यात आले असून ती तीव्र जोखीम गटात आली आहे. या ग्रामपंचायतीला आता मध्यम जोखमीच्या गटात आणण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. दरवर्षी आरोग्य विभागाकडून मॉन्सूनपूर्व व मॉन्सून पश्चात पाण्याच्या स्रोतांचे परीक्षण केले जाते.

या पूर्व परीक्षणात जिल्ह्यातील एकूण ८३६ ग्रामपंचायत अंतर्गत १५३८ गावांमध्ये पाण्याच्या स्रोतांचे नमुने घेण्यात आले होते. त्यामध्ये २३१ ग्रामपंचायतीला पिवळे कार्ड तर ६०४ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आले आहे. मात्र मध्यम जोखीम गटात २३१ ग्रामपंचायत असल्याने आरोग्य विभागाला तिची श्रेणी वाढू नये, याची काळजी घ्यावी लागणार आहे.

जलवाहिनी लिकेज झाल्यास पावसाचे दूषित पाणी त्यामध्ये जाते आणि अतिसार व अन्य साथजन्य आजाराचा प्रादुर्भाव होत असतो. तो टाळण्यासाठी नागरिकांनी आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता ठेवावी. तसेच ग्रामपंचायतींनी जलस्रोतांच्या परिसरातील शेणाचे ढिगारे हटविणे आवश्यक आहे. या कामामध्ये प्रशासनासोबतच नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा आहे.
- डॉ. सुरेश आसोले, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा दरात सुधारणा; केळी दर नरमले, ज्वारीला मागणी कायम, आले दरात सुधारणा तर कांद्याची दरपातळी कायम

Mumbai Rain: मुंबईतील पावसाने २६ जुलै २००५ ची आठवण; अनेक भागात जनजिवन विस्कळीत

Khandesh Cotton Crisis : खानदेशात जिनिंग प्रेसिंग कारखान्यांची धडधड बंद

Crop Insurance Crisis: पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ; गेल्यावर्षीच्या तुलनेत केवळ २२ टक्के अर्ज

Solapur Power Loss : सोलापूर मंडलाची वीजहानी सर्वाधिक

SCROLL FOR NEXT