Crop Damage Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : एप्रिलमधील नुकसानीपोटी दोन कोटींच्या निधीची मागणी

Heavy Rain Crop Loss : जिल्ह्यात एप्रिल महिन्यातील पहिल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामध्ये प्रामुख्याने मिरज, वाळवा, पलूस, खानापूर, जत, तासगाव आणि कवठेमहांकाळ या सात तालुक्यांतील जिरायत, बागायती आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात एप्रिल महिन्यात मॉन्सूनपूर्व पावसामुळे सात तालुक्यातील ११०३ शेतकऱ्यांचे ५५६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. बाधित झालेल्या पिकांसाठी १ कोटी ९१ लाख ५० हजार अपेक्षित भरपाई निधीची मागणी केली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात एप्रिल महिन्यातील पहिल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामध्ये प्रामुख्याने मिरज, वाळवा, पलूस, खानापूर, जत, तासगाव आणि कवठेमहांकाळ या सात तालुक्यांतील जिरायत, बागायती आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जत तालुक्यात ३०८ शेतकऱ्यांचे १३२ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले.

तर कवठेमहांकाळ तालुक्यात ४२१ शेतकऱ्यांचे २३१ हेक्टरवरील फळ पिकांना फटका बसला. जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वाधिक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जिल्ह्यातील कडेगाव, आटपाडी आणि शिराळा या तीन तालुक्यांत अवकाळी आणि गारपीट झाली नाही.

त्यामुळे या तालुक्यातील पिकांचे नुकसान झाले नाही.मिरज, वाळवा, पलूस, खानापूर, जत, तासगाव आणि कवठेमहांकाळ या सात तालुक्यांतील मॉन्सूनपूर्व पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त झालेल्या बाधित पिकांचे पंचनामे कृषी विभागाने तातडीने पूर्ण त्याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे. नुकसान झालेल्या पिकांसाठी १ कोटी ९१ लाख ५० हजार ४०० रुपये अपेक्षित भरपाई निधीची मागणी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dr. Anand Nadkarni : मनाला दिलासा देणारा आवाज हरपला; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे दुःखद निधन

Social Initiatives: सामाजिक कामांतही हवा कार्यक्षमतेचा, परताव्याचा विचार

Gender Equality: लैंगिक समानतेसाठी धोरणात्मक बदल अपरिहार्य

Non MSP Recommendations: बिगर हमीभाव शिफारशींचे काय ?

Baliraja Farm Road Scheme: मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी : जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT