Chh. Sambhajinagar News : जिल्ह्यातील अनेक भागात शुक्रवारी (ता १६ ) दुपारनंतर वादळी वाऱ्यासह आलेल्या पूर्व मोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी वाजेपर्यंत भाग बदलून पावसाचा जोर कायम होता.
माहितीनुसार, जिल्ह्यातील लासूर स्टेशनला विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला. आळंद परिसरात १२ ३० वाजेच्या सुमारास धुव्वाधार पावसास सुरुवात झाली. माणिकनगरात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. बिडकीन व चितेगाव परिसराला तब्बल ३० मिनिटे जोरदार पावसाने धुतले. खंडाळा परिसरातही अर्धा तास जोरदार पाऊस झाला.
घरावरील पत्रे उडाले, वीज पडून गाय बैल दगावले
माणिकनगर (ता. सिल्लोड) परिसरात शुक्रवारी दुपारी झालेल्या वादळ व विजेचा कडकडाटासह झालेल्या पावसाने हाहाकार उडाला. केऱ्हाळ्यात अनेक घरावरील पत्रे उडाले. तर बोरगाव कासारीत वीज पडून गाय दगावली.
माणिकनगर परिसरात शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुरु झालेल्या वादळी व विजेचा कडकडाटच्या पावसाने भवन, पिंपळगाव पेठ, पिंपरी, वरुड, तांडाबाजार, केऱ्हाळा, बोरगाव कासारी, तलवाडा, बनकिन्होळा, बाभूळगाव बु, गेवराई सेमी, वरखेडी, भायगाव, आदी ठिकाणी वादळी वाऱ्यासह हजेरी लावली.
पाऊस जवळपास एक ते दीड तास चालला. या वादळी पावसाने केऱ्हाळा (ता. सिल्लोड) येथील विनोद लक्ष्मण देहाडे, रुख्याबी इब्राहिम पठाण यांच्यासह अनेकांच्या घरावरील पत्रे उडून दूरवर जाऊन पडले. धुव्वाधार पावसाने घराच्या भिंती कोसळल्या. यात सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही.
मात्र संसार उघड्यावर पडल्याने कुटुंब हतबल झाले.बोरगांव कासारी (ता. सिल्लोड) शिवारातील गोरख उत्तम ब्राम्हणे यांच्या मालकीच्या शेतात बांधलेल्या गाईवर वीज पडून गाय दगावली. गेवराई सेमी येथील जुनापानी शिवारातील उत्तम पंडित ताठे यांचा मालकीचा शेतात बांधलेला बैलावर वीज पडल्याने तो बैल दगावला. परिसरात अनेक ठिकाणी मका, बाजरी, पिके आडवी झाल्याने खूप नुकसान झाले. काही ठिकाणी झाडेही पडली आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.