Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Crop Damage : शिराळा तालुक्यात मका पिकाचे नुकसान

Heavy Rain Crop Loss : शिराळा तालुक्याच्या पश्चिमोत्तर भागातील अनेक शेतकरी बांधवांनी प्रायोगिक तत्त्वावर विविधांगी भाजीपाला, फळ पिकांची लागवड केलीय.

Team Agrowon

Sangli News : शिराळा तालुक्याच्या पश्चिमोत्तर भागामध्ये गेल्या चार-पाच दिवसांपासून जोर धरलेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे भुईमूग, आंबा फळबाग, फळभाज्यांचे तसेच शेतशिवारातील विशेषतः मका पिकाचे मोठे नुकसान होत आहे.

हातातोंडाशी आलेल्या शेतशिवारातील विविधांगी पिकांचे अतोनात नुकसान होत असल्याने बळिराजा हतबल झाला आहे. त्याचा आर्थिक फटका बळिराजाला सोसावा लागतोय. शिराळा तालुक्याच्या पश्चिमोत्तर भागातील अनेक शेतकरी बांधवांनी प्रायोगिक तत्त्वावर विविधांगी भाजीपाला, फळ पिकांची लागवड केलीय.

शिंदेवाडी येथील शेतकरी गोरख शिंदे यांनी जवळपास अर्धा एकर क्षेत्रात काकडी लागवड केलीय, त्यासाठी जवळपास तीस-पस्तीस हजारांहून अधिक खर्च केलाय.

चिंतामणी खांडेकर, तुकाराम खांडेकर, खंड परिसरातील विश्वास मस्के, बेलेवाडीतील संजय सपकाळ यांनीही मोठ्या प्रमाणावर काकडी लागवड केलीय. सर्वांचेच दोन-तीन तोडे झालेत. पुढेही चांगले उत्पन्न मिळण्याची आशा सर्व होती. मात्र पावसामुळे काकडी वेलला आलेली फुले जळून गेली आहेत.

पावसाच्या आगमनाची बातमी हवामान खात्याने वर्तवली होती. हंगामपूर्व पाऊस झाल्याने शेतकरी वर्गामध्ये सुरुवातीला समाधानाचे वातावरण होते. परंतु पाऊस काही विश्रांती घेईना, त्यामुळे शेतकरी बांधवांची शेतीची कामे खोळंबलीत, विशेषतः भात पीक पेरणी खोळंबलीय, सर्वच शेतकरी बांधव पाऊस थांबण्याची वाट पाहू लागलेत.
- राजाराम दळवी, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT