Water Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Jalna Water Crisis : पस्तीस प्रकल्पांत जोत्याखाली पाणी, तर तीन कोरडे

Water Scarcity : मागील वर्षी अल्प पाऊस झाल्याने यंदा मध्यम व लघू प्रकल्पांनी तळ गाठला आहे. परिणामी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली.

Team Agrowon

Jalna News : मागील वर्षी अल्प पाऊस झाल्याने यंदा मध्यम व लघू प्रकल्पांनी तळ गाठला आहे. परिणामी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. परंतु, मे महिन्यात झालेल्या  माॅन्सूनपूर्व पावसामुळे कोरडे पडलेल्या सातपैकी चार लघू प्रकल्पांत पाणीसाठा झाला आहे. परंतु, आजही जिल्ह्यात  केवळ ११.९९ टक्के उपयुक्त पाणीसाठा सध्या शिल्लक आहे.

जिल्ह्यात सात मध्यम व ५७ लघू प्रकल्प आहेत. हे ६४ प्रकल्प पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरले तर जिल्ह्यात पाणीटंचाईचा होत नाही. परंतु, गतवर्षी हे असमतोल पाऊस झाल्याने प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नाही. त्यामुळे मे महिन्यात प्रकल्पांमधील पाणी तळाला गेले.  याच मध्यम व लघू प्रकल्पाच्या क्षेत्रात शेकडो गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत.

प्रकल्पाचे पाणी कमी झाल्यानंतर सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची पाणी पातळीवरी विपरीत परिणाम होतो. परंतु, मे महिन्यात झालेल्या माॅन्सूनपूर्व पावसामुळे काही प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यात सात लघू प्रकल्प कोरडे होते. त्यातील चार लघू प्रकल्पांमध्ये माॅन्सूनपूर्व पावसामुळे पाणी आल्याने सध्या तीन लघू प्रकल्प कोरडे आहेत.

तर, सात मध्यम प्रकल्पांत पंधरा दिवसांपूर्वी  १३.९४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. माॅन्सूनपूर्व पावसामध्ये हा पाणीसाठी स्थिर राहिला असून आजघडीला १३.०७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

शिवाय ५७ लघू प्रकल्पांमध्ये पंधरा दिवसांपूर्वी ११.७८ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. यामध्ये माॅन्सूनपूर्व पावसामुळे वाढ झाली असून सध्या १३.८० टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.  त्यामुळे यंदा पावसाळ्यात जोरदार पाऊस झाला नाही मध्यम व लघू प्रकल्प तंडुंब भरतील अशी अशा आहे.

मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठ्यांची स्थिती

कल्याण गिरिजा (ता. जालना) ः १६.४२ टक्के उपयुक्त पाणीसाठा

कल्याण मध्यम (ता.जालना)ः जेत्याखाली पाणी

अपर दुधना (ता.बदनापूर) ः २६.३२ टक्के उपयुक्त पाणीसाठा

जुई मध्यम (ता.भोकरदन) ः १८.७२ टक्के उपयुक्त पाणीसाठा

धामना मध्यम (ता.भोकरदन) ः २५.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा

जिवरेखा मध्यम (ता.जाफराबाद) ः ८.६१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

गल्हाटी मध्यम (ता.अंबड) ः ५.१४ टक्के उपयुक्त पाणीसाठा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Fourth List: कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांचा समावेश

Fodder Self Sufficiency: दुष्काळात तोंगलाबादचा ‘चारा स्वयंपूर्णतेचा आदर्श ‘पॅटर्न’

Village Development Committees: स्थापन करा दुष्काळ आकलन, निवारण ग्रामविकास समिती

Farmer Issue: दुष्काळातही शेतकऱ्यांवर अन्याय!

Digital Agriculture Policy: डिजिटल सुसूत्रीकरणाचे स्वागतच!

SCROLL FOR NEXT