Sugarcane Season  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Rate : भविष्यात ‘प्रतापगड’ इतरांप्रमाणे दर देणार : शिवेंद्रसिंहराजे

Sugarcane Season : सोनगाव (ता. जावळी) येथील अजिंक्यतारा- प्रतापगड साखर उद्योग समूहाचा दुसरा गळीत हंगामाचा अंतिम ११ साखर पोत्यांचे पूजन करून सांगता करण्यात आली.

Team Agrowon

Satara News : ‘‘अनेक अडचणींवर मात करून प्रतापगड कारखाना पुन्हा उभा राहिला असून, ऊस पुरवठादार शेतकरी, सभासद आणि कामगारांनी असेच सहकार्य ठेवल्यास आज ना उद्या, दोन- पाच वर्षांनंतर इतर कारखान्यांच्या तुलनेत स्पर्धात्मक व उच्चतम दर देणारा कारखाना असा नावलौकिक मिळवेल,’’ असा विश्‍वास सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व्यक्त केला.

सोनगाव (ता. जावळी) येथील अजिंक्यतारा- प्रतापगड साखर उद्योग समूहाचा दुसरा गळीत हंगामाचा अंतिम ११ साखर पोत्यांचे पूजन करून सांगता करण्यात आली. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रतापगड कारखान्याच्या संस्थापक संचालिका सुनेत्रा शिंदे, कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, उपाध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर, अजिंक्यताराचे अध्यक्ष यशवंत साळुंखे, उपाध्यक्ष नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, राजेंद्र भिलारे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘जावळी तालुक्यातील एकमेव मोठी सहकारी संस्था असलेला प्रतापगड साखर कारखाना ऊस पुरवठादार, शेतकरी, सभासद आणि कामगार यांच्या लाखमोलाच्या सहकार्यातून अजिंक्यतारा प्रतापगड साखर उद्योग समूहाचा दुसरा गळीत हंगाम यशस्वी झाला.

९२ दिवसांच्या या हंगामात कारखान्याने एक लाख ९१ हजार टन उसाचे गाळप केले असून, अंदाजे सव्वादोन लाख पोती साखर उत्पादन करण्यात आले आहे. या वर्षी संपूर्ण जिल्ह्यात उसाचे क्षेत्र कमी होते. यंदा जरी आपण तोट्यात असलो, तरी पुढच्या वर्षी मात्र पूर्ण क्षमतेने कारखाना चालवून किमान ५ लाख गाळपाचे आपण उद्दिष्ट ठेवले आहे, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.’’

सौरभ शिंदे म्हणाले, की बंद पडलेला कारखाना शिवेंद्रसिंहराजेंच्या साथीमुळे पुन्हा उभा राहिला आहे. शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या सहकार्याने कारखाना यशस्वी गाळप करू शकला. या वेळी अधिकारी व कामगारांचा सत्कारही करण्यात आला. उपाध्यक्ष नामदेव सांवत यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pest & Disease APP : शेतकऱ्यांना मोबाईलवरच मिळणार ४१ पिकांवरील किड व रोगांची अचूक माहिती; महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं शेतकऱ्यांसाठी अॅप

Banana Farming : चुकांना सुधारत यशस्वी शेतीकडे

Land Record: समजून घ्या गाव नमुना

Cotton Farming: कपाशीत वाण निवडीला प्राधान्य

Maharashtra Politics: गणंगांची फौज हीच महाराष्ट्राची ओळख?

SCROLL FOR NEXT