Agriculture Electricity  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity Crisis : विजेच्या लपंडावाने शेतकरी त्रस्त

Agriculture Pump Electricity Issue : सध्या पिकाला मिळत भाव परवडत नाही, त्यातच रासायनिक खतांच्या भरमसाट वाढल्या किमती यातूनही शेतकऱ्यांची मार्ग परिक्रमाना सुरू असून पिके जगवण्यासाठी धडपड सुरू ठेवत आहे.

Team Agrowon

Satara News : जिल्ह्यातील तापमान वाढ झाल्याने पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मात्र कृषी पंपांना लागणाऱ्या विजेचा लपंडाव व अपुऱ्या दाबाने केला जात असलेला वीज पुरवठ्यामुळे पिकांना पाणी देता येणे शक्य होत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. पाणी असून पिके वाळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

जिल्ह्यातील साखर हंगाम संपला असलातरी अजून अनेक कारखान्यांकडून अंतिम टप्प्यातील बिले जमा झालेली नाहीत. सध्या पिकाला मिळत भाव परवडत नाही, त्यातच रासायनिक खतांच्या भरमसाट वाढल्या किमती यातूनही शेतकऱ्यांची मार्ग परिक्रमाना सुरू असून पिके जगवण्यासाठी धडपड सुरू ठेवत आहे. प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना वेगवेगळे समस्या निर्माण होत आहेत. जिल्ह्यात मागील पावसाळ्यात दमदार पाऊस झाल्याने सर्वच धरणात चांगला पाणीसाठा उपलब्ध आहे.

मात्र पाणी असून ते पिकांना देता येत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे. जिल्ह्यातील कृषी पंपासाठी आठ तास वीज दिली जाते. यामध्ये चार दिवसा व तीन दिवस रात्रीची वीज दिली जाते. मात्र वीजेचा वारंवार लपंडाव सुरू आहे.

यामुळे पिकांना पाणी देण्याची सायकल पूर्ण होत नाही. या प्रकारामुळे पाणी असून पिके वाळून जात आहेत. तसेच महावितरणकडून कमी दाबाने वीज पुरवठा केला जात आहे. या प्रकारामुळे वीज असूनही कृषिपंप सुरू होत नाही. एप्रिल महिना सुरू झाल्यापासून हा प्रकार वाढला आहे.

शेतकरी वारंवार कर्मचारी, वायरमन यांच्याशी संपर्क करूनही उपाययोजना होत नाहीत. जिल्ह्यातील तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअस वर गेल्याने पिकांना पाणी देणे क्रमप्राप्त झाले आहे. महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी अडचणीत आहे आले आहेत. अनेक कार्यालयात अपुरी कर्मचारी संख्या असून कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे.

या कर्मचाऱ्यांना मर्यादा असतात. तरीही या कर्मचाऱ्यांच्याकडून धोकादायक पद्धतीने कामे करून घेतली जात आहे. ही कामे नीट नाही झाली तर त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहेत. साडेसात एचपीपर्यंत वीज माफी असल्याने या शेतकऱ्यांकडे तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे.

कंटाळून सौरऊर्जा पंप घेण्याकडे कल

जेचा लपंडाव व अपुऱ्या दाबाने होत असलेल्या प्रकाराकडे मंत्री व लोक प्रतिनिधी घालण्यासाठी काही ठिकाणी निवेदनही दिली जात आहे. मात्र अजूनही या समस्यांवर ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. यामुळे शेतकरी कंटाळून सौरऊर्जा पंप घेण्याकडे कल वाढला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

Cotton Market Price: कापूस दबावातच; तसेच काय आहेत सोयाबीन, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि खरबुजाचे आजचे बाजारभाव

Crop Damage Survey: आंबा, काजू नुकसानीचे सर्व्हेक्षण सुरू

SCROLL FOR NEXT