Batata Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Potato Market : उत्पादन घटले, पण बाजारभावाने काहीसे तारले

Potato Farming : यंदा बटाटा पिकाला लागणाऱ्या पोषक थंडीअभावी आणि अवेळी पडलेल्या पावसाचा फटक्यामुळे बटाटा उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.

नवनाथ भेके

Ambegaon News : यंदा बटाटा पिकाला लागणाऱ्या पोषक थंडीअभावी आणि अवेळी पडलेल्या पावसाचा फटक्यामुळे बटाटा उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनखर्चही वाढला आणि उत्पादनही निम्म्याने घटले आहे, परंतु समाधानकारक बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्याला आधार मिळाला. त्यामुळे उत्पादन घटले पण बाजारभावाने काहीसे तारले, अशी परिस्थिती यंदा पहावयास मिळत आहे.

यंदाच्या वर्षी लागवडीसाठी लागणाऱ्या बटाटा बियाण्याचे दर कडाडल्याने भांडवली खर्चात मोठी वाढ झाली, याचा परिणाम बटाटा लागवडीवर झाला. यंदा बटाटा पिकाचे आगार म्हणून ओळख असलेल्या नागापूर, थोरांदळे, जाधववाडी, रांजणी, नागापूर परिसरांत याचा परिणाम होऊन लागवडीत मोठी घट झाली आहे. यंदाच्या वर्षी शेतकऱ्याला बटाटा बियाणे ३५०० ते ४५०० प्रतिक्विंटल दराने खरेदी करावे लागले हाच दर मागील वर्षी निम्म्याने होता. बियाण्याचा वाढलेला दर आणि उत्पादन खर्च यामुळे एकरी खर्च एक लाखाच्या वर शेतकऱ्याला करावा लागला.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात खरीप हंगामातील बटाटा काढणी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. बटाटा फुगवणीचा काळ आणि पाऊस पडण्याची वेळ एक आली आणि पिकाला पोषक थंडी न मिळाल्याचा परिणाम बटाटा उत्पादनावर झाला आहे. यंदा बटाट्याचे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत निम्म्याने घटले आहे, पण बाजारभाव मागील वर्षीच्या तुलनेत दुपटीने मिळाल्याने शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. यंदाच्या वर्षी शेतकऱ्याच्या बटाट्याला ३२५ रुपये दहा किलोमागे सर्वाधिक दर मिळाला असून सध्या बटाट्याला २५० ते २६० रुपये प्रति दहा किलोमागे दर मिळत आहे. यंदा उत्पादन सरासरी पिशवीमागे ७ ते ८ पिशवीचे गळीत मिळाले आहे. मागील वर्षी उत्पादन चांगले मिळाले पण बाजारभाव कमी मिळाला.

यंदाच्या वर्षी बटाटा पिकाला पोषक हवामान मिळाले नाही. तसेच अवेळी पडलेल्या पावसामुळे बटाटा उत्पादनात निम्म्याने घट झाली आहे. लागवडीसाठी असलेले बियाणे ३५०० ते ४५०० प्रतिक्विंटल दराने खरेदी करावे लागल्याने बियाणे, मशागत, खते, कीडनाशक, कोंबडखत, मजुरी, फवारणी असा एकूण एकरी खर्च एक लाखांच्या घरात गेला आहे. अशामध्ये उत्पादन घटल्याने मोठा फटका बसला आहे, परंतु यंदा बाजारभाव समाधानकारक असल्याने थोडा आधार मिळाला आहे.
मंगेश जाधव, बटाटा उत्पादक शेतकरी, जाधववाडी, ता.आंबेगाव
यंदा बटाटा पिकाचा भांडवली खर्च मोठा होता. त्यातच पोषक हवामान न मिळाल्याने बटाटा उत्पादन निम्म्याने घटले आहे. तसेच यंदा बटाटा पिकाला २५० रुपयांपासून ते ३२५ रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे.
सागर विश्वासराव, बटाटा उत्पादक शेतकरी, थोरांदळे, ता. आंबेगाव

पाच वर्षांतील बटाटा विक्री दर (सर्व दर प्रती १० किलोचे आहे)

२०२० ९० ते १२०

२०२१ ३०० ते ३२०

२०२२ १५० ते २००

२०२३ १०० ते १५०

२०२४ २६० ते ३२५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

Turmeric Harvest Management: हळद काढणी पश्चात व्यवस्थापनावर मार्गदर्शन

Farmer Compensation Maharashtra : राज्यात २ लाख ४ हजार हेक्टर शेतीपिकांचं नुकसान; शेतकऱ्यांना लवकरात-लवकर मदत देणार, कृषिमंत्री भरणे यांची ग्वाही

Fertilizer Stock Approved: अकोला जिल्ह्यासाठी १.१४ लाख टन खत मंजूर

SCROLL FOR NEXT