Wheat  Agrowon
ॲग्रो विशेष

Post Monsoon Rain : मॉन्सुनोत्तर पावसाने रब्बीला तारले

Rabi Season : जिल्ह्यात सोमवारी (ता. २७) पहाटे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. हा पाऊस देगलूर वगळता जिल्ह्याच्या सर्वच भागांत झाला. या पावसामुळे रब्बी पिकाला दिलासा मिळाला आहे.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात सोमवारी (ता. २७) पहाटे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. हा पाऊस देगलूर वगळता जिल्ह्याच्या सर्वच भागांत झाला. या पावसामुळे रब्बी पिकाला दिलासा मिळाला आहे. तब्बल अडीच महिन्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे अर्धापूर तालुक्यासह जिल्ह्यातील १२ मंडळात अतिवृष्टी झाली. सकाळी साडेदहा पर्यंत जिल्ह्यात सरासरी ३६.५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

नांदेडमध्ये यंदा सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात पाऊस झाला. या पावसानंतर मात्र पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरविली. यामुळे याचा यंदा रब्बीला मोठा फटका बसला. जमिनीत ओल नसल्याने शेतकऱ्यांना रब्बीत हरभरा, ज्वारी, करडई, धने, गहू आदी पीके पेरता आले नाहीत.

परिणामी हजारो हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे. यासोबतच खरिपातील तूर आणि कपाशीलाही पावसाअभावी झळ सोसावी लागली. काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या पाण्याचा वापर करुन हरभरा व ज्वारीची पेरणी केली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागानेही पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. परंतु सोमवारी (ता. २७) पहाटे जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. हा पाऊस देगलूर व मुखेड तालुका वगळता इतरत्र बऱ्या प्रमाणात झाला.

यामुळे अर्धापूर तालुक्यासह जिल्ह्यातील तब्बल १२ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे रब्बीतील हरभरा, गहू, ज्वारी या पिकांसह खरिपातील कपाशी व तुरीला दिलासा मिळाला आहे. हा पाऊस लोहा, कंधार, नांदेड, अर्धापूर, हदगाव या तालुक्यात सर्वाधिक झाला.

अतिवृष्टी झालेले महसूल मंडळ

लिंबगाव ९९, तरोडा बुद्रुक ८२.३०, अर्धापूर ७७.५०, उस्माननगर ७६.३०, सोनखेड ७६.३०, कलंबर ७६.३०, शेवडी ७४, नाळेश्‍वर ७०.८०, दाभड ६९, नांदेड शहर ६८, तामसा ६५.३०, पिंपरखेड ६५.३०.

तालुकानिहाय झालेला सरासरी पाऊस

नांदेड - ६१.५०, बिलोली - ९.१०, मुखेड - ४.४०, कंधार - ४२.९०, लोहा - ६३.४०, हदगाव - ५४.२०, भोकर - ५३.१०, देगलूर - शुन्य, किनवट - ३२, मुदखेड - ५३.६०, हिमायतनगर ४८.५०, माहूर ३१.६०, धर्माबाद २१.७०, उमरी - ४४, धर्माबाद - ६७.३०, नायगाव ३०.१०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tree Plantation: नाशिकमध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

Power Supply Issue: वीज कपातीमुळे पिके धोक्यात; संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणवर धडक मोर्चा

Farm Loan Waiver: कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT