Kesar Mango Agrowon
ॲग्रो विशेष

Kesar Mango : ...तर नोव्हेंबरशेवटी केसर आंब्याला चांगला मोहर शक्य

Mango Farming : काडी पक्व करून घेतल्यास केसर आंब्याला नोव्हेंबरच्या शेवटी चांगला मोहर लागणे शक्य असल्याचे मत आंबा तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Jalna News : काडी पक्व करून घेतल्यास केसर आंब्याला नोव्हेंबरच्या शेवटी चांगला मोहर लागणे शक्य असल्याचे मत आंबा तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी व्यक्त केले. नुकताच ॲग्रो इंडिया गट शेती संघाचा २०२६ द्वादश कार्यक्रम देवळेगव्हाण (ता. जाफराबाद) येथील प्रकाश कापसे यांच्या अतिघन आंबा लागवडीत पार पडला.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. कापसे बोलत होते. डॉ. कापसे म्हणाले, की आंबा बागेमध्ये नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात मोहोर येणे अत्यंत फायद्याचे आहे. त्यासाठी जुलैच्या शेवटी ते ऑगस्टमध्ये आंबा बागेत पॅक्लोब्युट्राझोलचा वापर करणे आवश्यक आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कार्यक्रमाच्या सुरुवातीस बदनापूर येथील डॉ. दरख तसेच टेंभुर्णी येथील खोत महाराज यांच्या आंबा बागेत शिवार फेरी झाली.

त्यानंतर गाडेगव्हाण येथील भगवान बनकर यांच्या कर्टुली बागेस आणि देळेगव्हाण येथील संतोष बोर्डे यांच्या आंबा आणि कापूस पिकात शिवार फेरी करून मार्गदर्शन करण्यात आले.

शिवारफेरीचा समारोप प्रकाश कापसे यांच्या शेतात अंबा बागेस शिवार फेरी करून मुख्य कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण सवडे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT