Chana GI Agrowon
ॲग्रो विशेष

Chana GI : खारपाणपट्टयातील हरभऱ्याला ‘जीआय’ मिळण्याची शक्यता

Agriculture GI Tagging : पूर्णा नदीकाठावर विस्तारित खारपाणपट्टयात उत्पादित हरभऱ्याला विशिष्ट चव आहे. त्यामुळेच त्याला देशभरातून मागणी देखील मोठी आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravati News : पूर्णा नदीकाठावर विस्तारित खारपाणपट्टयात उत्पादित हरभऱ्याला विशिष्ट चव आहे. त्यामुळेच त्याला देशभरातून मागणी देखील मोठी आहे. हीच बाब हेरत या हरभऱ्याला भौगोलिक मानांकन मिळावे, यासाठी प्रयत्न होत आहेत. कृषी विभाग व अंजनगावसुर्जी येथील कार्ड संस्थेकडून त्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे या प्रकल्पासाठी तब्बल १६ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पश्‍चिम विदर्भात पूर्णा नदीकाठच्या परिसरात खारपाणपट्टा विस्तारित आहे. पूर्वी हा भाग समुद्राची खाडी होता. भूगर्भात सातत्याने होत असलेल्या स्फोटातून भूभाग तयार झाला, असे कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ सांगतात. अकोला, बुलडाणा, अमरावती या तीन जिल्ह्यात याचा विस्तार आहे. जमिनीत पाण्याची मुबलकता असली तरी त्यात क्षाराचे प्रमाण अधिक आहे.

त्यामुळे या पाण्याचा शेतीकामी उपयोग शक्‍य होत नाही. मात्र याच क्षारामुळे येथील शेतीमालाला विशिष्ट गंध मिळतो. जमिनीचे गुणधर्म पिकात उतरत असल्याने चवीला देखील या भागातील शेतीमाल सरस ठरतो. त्यामध्ये हरभरा पहिल्या क्रमांकावर आहे.

खारपटपणा अधिक असल्याने दिल्ली, हरियाना, पंजाब या भागातून याला मागणी राहते. त्याच कारणामुळे देशभरात विशिष्ट गुणधर्म जपणाऱ्या या हरभऱ्याला आता भौगोलिक मानांकन मिळवून देण्याचा प्रयत्न होत आहे.

कार्ड (कम्युनिटी ऍक्‍शन फॉर रूरल डेव्हलपमेंट सोसायटी) व वैपुल्य रेनफे फार्मर्स प्रोड्युसर कंपनी या संस्थेकडून हे काम होणार आहे. औषधी गुणधर्म असलेल्या पानपिंपळीचा देखील ‘जीआय’साठी प्रस्ताव असून त्याकरिता साडेसोळा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

हरभरा आणि पानपिंपरीला भौगोलिक मानांकन मिळावे याकरिता गेल्या वर्षीपासून पाठपुरावा सुरू आहे. नावीन्यपूर्ण बाब म्हणून या दोन्ही पिकांसाठी प्रत्येकी १६ लाख ५० हजार रुपये याप्रमाणे ३३ लाख रुपये मंजूर केले आहेत. दोन वर्षात भौगोलिक मानांकन मिळावे, असे प्रस्तावित आहे.
- राहुल सातपुते, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, अमरावती.
अकोला, बुलडाणा, अमरावती या तीन जिल्ह्यांत ८०० हेक्‍टरवर पानपिंपळी होते. यातून वर्षाकाठी २२ कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. त्यामुळे या पिकाला देखील भौगोलिक मानांकन मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा नियोजन समितीने आता पैशाची तरतूद केल्याने हा प्रकल्प मार्गी लागेल. हरभरा आणि पानपिंपळीला याव्दारे वैभव प्राप्त होईल.
- विजय लाडोळे, अध्यक्ष, कार्ड संस्था, अंजनगावसूर्जी, अमरावती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT