Weather Update Agrowon
ॲग्रो विशेष

Weather Update : किमान तापमानात घट होण्याची शक्यता

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ हवामान होत आहे. मंगळवारी (ता. ३१) सायंकाळपासूनच वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे धुके कमी झाले आहे.

Team Agrowon

पुणे : ढगाळ आकाश (Cloudy Weather), पावसाची हजेरी, धुक्यामुळे (Fog) राज्याच्या किमान तापमानात (Temperature) वाढ झाल्याने थंडी (Cold) कमी झाली आहे. उन्हाचा चटका अन् उकाडाही वाढला आहे. आज (ता. २) राज्याच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ हवामान होत आहे. मंगळवारी (ता. ३१) सायंकाळपासूनच वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे धुके कमी झाले आहे.

बुधवारी (ता.१) दिवसभर अनेक भागांत जोरदार वारे वाहत होते. किमान तापमानातील वाढ कायम असल्याने बुधवारी (ता.१) निफाड येथील गहू संशोधन केंद्र व धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान १३ ते २० अंशांच्या दरम्यान आहे. कमाल तापमानातही वाढ झाली असून, दुपारच्या वेळी उकाडा जाणवत आहे. रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाब क्षेत्र (डिप्रेशन) बुधवारी (ता. १) रात्री श्रीलंकेच्या पूर्व किनाऱ्याला धडकले. ही प्रणाली नैर्ऋत्य दिशेकडे जात असून, तिच्या प्रभावामुळे तमिळनाडू, केरळ, लक्षद्वीप बेटांवर विजांसह पावसाची शक्यता आहे.

तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत जोरदार वारे वाहणार असल्याने मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

उत्तर भारतातील राज्यात थंडी कमी-अधिक होत आहे. बुधवारी (ता. १) राजस्थानच्या बिकानेर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

बुधवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३०.५ (२०.८), जळगाव - (१४.५), धुळे २८.५ (१२.०), कोल्हापूर ३०.५ (२०.८), महाबळेश्वर २५.७ (१३.६), नाशिक २९.८ (१६.७), निफाड २९.२ (१२.०), सांगली ३१.४ (१९.१), सातारा ३०.६ (१९.१), सोलापूर ३२.६ (२०.५), सांताक्रूझ ३३.२ (२२.४)

डहाणू २६.९ (१८.५), रत्नागिरी ३४.०(२१.०), औरंगाबाद ३०.४ (१४.२), नांदेड - (१९.०), परभणी ३१.२(१७.०), अकोला ३२.५ (१६.३), अमरावती ३२.८ (१६.१), बुलडाणा २९.२ (१५.४), ब्रह्मपुरी ३३.३ (१७.०), चंद्रपूर ३१.६ (१८.२), गडचिरोली ३२.०(१५.६), गोंदिया ३१.५(१६.०), नागपूर ३१.५ (१७.६), वर्धा ३१.५(१७.६), यवतमाळ ३१.२ (१७.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT