APMC Market Agrowon
ॲग्रो विशेष

Pomegranate Price: आळेफाटा उपबाजारात डाळिंबाला ७ हजार रुपये दर

Junnar APMC: जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत आळेफाटा उपबाजार आवारात रविवारी (ता.२९) डाळिंबाच्या २० किलोच्या एका क्रेटला प्रतवारीनुसार ७ हजार रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला, अशी माहिती सभापती संजय काळे यांनी दिली.

गणेश कोरे

Junnar News: जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत आळेफाटा उपबाजार आवारात रविवारी (ता.२९) डाळिंबाच्या २० किलोच्या एका क्रेटला प्रतवारीनुसार ७ हजार रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला, अशी माहिती सभापती संजय काळे यांनी दिली.

आळेफाटा उपबाजारात कांद्याप्रमाणे आता डाळिंबाचे दररोज लिलाव मोठ्या प्रमाणावर होऊ लागले असून यामध्ये रविवारी (ता.२९) एक नंबर डाळिंबास वीस किलोच्या एका क्रेटला तब्बल प्रतवारीनुसार ७ हजार रुपयांचा भाव मिळाला आहे.

त्या खालोखाल त्याच्या दोन नंबर डाळिंबाच्या एका क्रेटला ४ हजार रुपयांचा भाव मिळाला आहे. तर तीन नंबरच्या एका वीस किलोच्या क्रेटला १ हजार ५०० रुपये बाजार भाव मिळाला आहे, तर चार नंबरच्या एका वीस किलोच्या क्रेटला ५०० रुपयांचा बाजारभाव मिळाला. तसेच बाजार समितीमध्ये २ हजार ३५१ विक्रमी क्रेटची आवक झाली होत

आळेफाटा येथील बाजार समितीत पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शिरूर, अहिल्यानगर या ठिकाणांहून शेतकरी डाळिंब विक्रीसाठी येत असल्याने त्यामुळे पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी ही महत्त्वाची बाजारपेठ असून, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दर मिळत असल्याचे सचिव रूपेश कवडे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT