Poultry Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Poultry Policy : खाण्यायोग्य कोंबडीच्या वजनासाठी ठरणार धोरण ; ‘पशुसंवर्धन’ने मागितला ‘माफसू’कडे अहवाल

Poultry Feed : राज्यातील पोल्ट्री व्यवसायिकांचे प्रश्‍न सुटावेत, या उद्देशाने राज्यस्तरीय कुक्‍कुट समन्वय समितीची स्थापना करण्यात आली.

Team Agrowon

Nagpur News : मांसल कुक्‍कुट पक्ष्यांच्या विक्रीचे वजन २ ते २.५ किलोपर्यंत राखल्यास मांसाची चव, गुणवत्ता व बाजारातील स्वीकृती वाढते, अशी संशोधनात्मक शिफारस महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाकडून करण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभागाकडून देखील आता या संशोधनात्मक बाबींचा आढावा घेतला जाणार आहे. त्याआधारे मांसल कुक्‍कुट पक्ष्याच्या वजनाबाबतचा धोरणात्मक निर्णय होणार आहे.

राज्यातील पोल्ट्री व्यवसायिकांचे प्रश्‍न सुटावेत, या उद्देशाने राज्यस्तरीय कुक्‍कुट समन्वय समितीची स्थापना करण्यात आली. पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आयुक्‍त हेमंत वसेकर व समिती सदस्यांच्या उपस्थितीत मुंबईत नुकतीच बैठक झाली.

करारदार कंपन्या त्यांच्या फायद्यासाठी जादा वजन असलेले मांसल पक्षी बाजारात आणतात. पक्ष्याचे वजन वाढविण्याच्या नादात त्याचे वय वाढते. परिणामी, त्याच्या मांसाची गुणवत्ता व चव राहत नाही, असे निरीक्षण ‘माफसू’ने अभ्यासाअंती नोंदविले आहे. मात्र कमी पशुखाद्यात वजन वाढत असल्याने कंपन्या हा प्रकार करतात. चव आणि मांसाची गुणवत्ता राहावी, यासाठी कुक्‍कुट पक्ष्याचे वजन २ ते २.५ किलोच असावे, अशी शिफारस ‘माफसू’ची आहे.

दरम्यान, समिती सदस्यांनी याच संशोधनाचा आधार घेत या संशोधनात्मक शिफारशींची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी रेटून धरली. त्यामुळे बाजारात कुक्‍कुट पक्ष्यांची अधिक प्रमाणावर विक्री होऊन हा व्यवसाय फायद्यात येईल. कंपन्यांच्या मनमानीला देखील यामुळे चाप बसेल. तसेच खवय्यांचा कल देखील मटणाऐवजी चिकनकडे वाढण्यास मदत होईल. समिती सदस्यांच्या या मागण्यांची दखल घे‍त डॉ. वसेकर यांनी गुरुवारी (ता.१६) ‘माफसू’च्या संशोधन संचालकांना पत्र लिहीत या संबंधीचा शास्त्रीय अहवाल मागितला आहे. त्यानंतर या प्रकरणी धोरणात्मक निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले.

‘‘दोन किलो वजन झाल्यानंतर कमी खाद्यात पक्ष्याचे वजन वाढते. त्यामुळे करारदार कंपन्या त्यांच्या फायद्यासाठी वजन वाढविण्यावर भर देतात. परंतु या मांसाची चव रबरासारखी लागते. परिणामी खवय्ये चिकनपासून दुरावत आहेत,’’ असे समितीचे सदस्य अतुल पेरसपुरे म्हणाले.

मांसल कोंबडीचे वजन २ ते २.५ किलोपर्यंतच असावे, अशी आमची मागणी आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीला आता गती मिळाली आहे. यामुळे चिकनला मागणी वाढत शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल.
- अतुल पेरसपूरे, सदस्य, कुक्‍कुट समन्वय समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Budget 2026: कोरडवाहू शेतीत कृषी संलग्न व्यवसायाला चालना

Agri Union Budget 2026: अन्नदाता शेतकऱ्यांचा भ्रमनिरास

Union Budget 2026: शेती बेदखलच!

Union Budget 2026: आर्थिक वाढीसाठी सर्वंकष प्रयत्नांचा संकल्प

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

SCROLL FOR NEXT