Namdeo Dhondo Mahanor Agrowon
ॲग्रो विशेष

Na Dho Mahanor : मराठी साहित्यातला 'रानकवी' हरपला, ना. धों. महानोर यांचे ८१ व्या वर्षी निधन

Namdeo Dhondo Mahanor Death: प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर यांचे निधन आज निधन झाला. पुण्यातील रुबी रुग्णालयात त्यांनी ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला

Team Agrowon

N D Mahanor Passes Away at 81: ज्येष्ठ साहित्यिक, कवी ना. धों. महानोर यांचे आज निधन झाले आहे. ते गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज उपचारादरम्यान ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.  त्यांच्या निधनाने साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पार्थिवावर उद्या (ता. ४)   छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पळसखेड या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांचे नामदेव धोंडो महानोर असे पूर्ण नाव होते. त्यांचा जन्म १६ सप्टेंबर 1942 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेडा गावात झाला. तर जळगाव जिल्ह्यात त्यांनी शिक्षण घेतले. महाविद्यालयीन शिक्षणानंतर ते शेतीत रमले.
 
 ना. धो. महानोर हे स्वत: शेतकरी असल्याने निसर्ग, शेतीविषयी असलेलं प्रेम त्यांच्या कवितेतून झळकत होते. त्यांचा'रानातल्या कविता' हा कवितासंग्रह खूप गाजला होता.  त्यांच्या कविता आणि गीतांमधून निसर्गाचे दर्शन घडत होते. त्यांच्या साहित्यात मराठी बोलीभाषांचा वापर पाहायला मिळतो. गीतकार म्हणून ना. धों. महानोर यांची ‘अवेळीच केव्हा दाटला अंधार’, ‘आम्ही ठाकर ठाकर’, ‘मी रात टाकली मी कात टाकली’, ‘घन ओथंबून येती, नभ उतरु आलं’ ही त्यांची गाणी आजही लोकांच्या ओठावर आहेत. महानोर हे १९७८ साली महाराष्ट्र विधान परिषदेचे नियुक्त सदस्य झाले होते. त्यांना १९९१ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

महानोर हे गेल्या काही वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत दुःख व्यक्त केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT