PM Kisan agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan : पीएम किसान वंचित शेतकऱ्यांना कृषी विभागाने राबवली विशेष मोहिम

sandeep Shirguppe

Agriculture Department Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात पीएम किसान सन्मान योजनेपासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. अनेक पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत. त्यामुळे २२ हजार ५७६ शेतकऱ्यांची ई-केवायसी, तर २५ हजार ७७६ शेतकऱ्यांचे बँक आधार लिंकिंग प्रलंबित आहे. या शेतकऱ्यांना कृषी विभागाने नविन संधी उपलब्ध करून दिली आहे. बुधवार (ता. २१) पर्यंत कृषी विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेंतर्गत संबंधित शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि बँक आधार लिंकिंग करून देण्याची सुविधा देण्यात आली आहे. याबाबत कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.

६ डिसेंबर २०२३ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीत जिल्ह्यात पीएम किसान योजनेसाठी मोहीम राबवून शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण, स्वयंनोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी केली.

मात्र, जिल्ह्यातील एकूण २२ हजार ५७६ शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभासाठी आवश्यक कादपत्रांची पूर्तता न करण्याबरोबरच ई-केवायसीही केलेली नाही. २५ हजार ७७६ लाभार्थ्यांनी बँक आधार लिंकिंग करणे प्रलंबित आहे. अशा शेतकऱ्यांना आपले सरकार सुविधा केंद्रांमार्फत ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी बुधवारपर्यंत कृषी विभागातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेदरम्यान केवळ ई-केवायसी प्रमाणीकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या आपले सरकार केंद्रामार्फत ई-केवायसी प्रमाणीकरण करावे. शेतकऱ्यांनी स्वतःचे ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओटीपी, सामायिक सुविधा केंद्र, पीएम किसान फेस ऑथेंटिफिकेशन अँप या सुविधापैकी कोणत्याही एका सुविधेचा वापर करावा, पीएम किसान योजनेचा १६ वा हप्ता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मिळणार आहे.

तसेच पीएम किसान योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थ्यांनाच 'नमो शेतकरी' महासन्मान हा राज्य शासनाच्या निधी योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या दोन्ही योजनांच्या लाभासाठी बुधवारपर्यंत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून बँक आधार लिंकिंग व ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.

अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांशीशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. भुदरगड तालुक्यात पीएम किसान योजनेत ३२ हजार १५ लाभार्थी आहेत. तालुक्यातील ३० हजार ९३५ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे, तर १०८० शेतकऱ्यांची अपूर्ण आहे.

पीएम किसान योजनेसाठीची ई-केवायसी नाही तर हप्ता नाही. त्यामुळे ई-केवायसी अपूर्ण असलेल्या शेतकऱ्यांनी बुधवारपर्यंत या मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता करावी, अन्यथा हप्ता मिळणार नाही. असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Production : उमरा मंडलात उत्पादनात घटीची शक्यता

Nath Jalashay : गेवराईतील राक्षसभुवनचे शनी मंदिर पाण्यात

Mosambi Fruit Fall : मोसंबीची निम्मी फळगळ ही वनस्पती शास्त्रीय कारणांनी

Cotton, Soybean Subsidy : कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी ई पीक पाहणीची अट रद्द; ७/१२ वरील नोंदीवरुनही मिळणार अनुदान

Shetkari Sangh Kolhapur : शेतकरी संघाच्या वार्षिक सभेत गोंधळ, पोटनियम दुरुस्तीचा ठराव मंजूर

SCROLL FOR NEXT