Bharat Sankalp Yatra Agrowon
ॲग्रो विशेष

Bharat Sankalp Yatra : ‘विकसित भारत संकल्‍प यात्रा यशस्‍वी करण्याचे नियोजन करा’

IAS Siddharam Salimath : अधिकारी, पदाधिकारी यांनी प्रभावीपणे नियोजन करून संकल्‍प यात्रेसाठी काम करावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी केले.

Team Agrowon

Nagar News : नगर जिल्‍ह्यातील तालुका व गावपातळीवर सुरू असलेली विकसित भारत संकल्‍प यात्रा यशस्‍वी करायची आहे. त्यासाठी अधिकारी, पदाधिकारी यांनी प्रभावीपणे नियोजन करून संकल्‍प यात्रेसाठी काम करावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी केले.

‘विकसित भारत संकल्‍प यात्रा’ नगर जिल्‍ह्यात प्रभावीपणे यशस्‍वी करण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. जिल्‍हा परिषद मुख्‍य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अप्‍पर जिल्‍हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सालीमठ म्‍हणाले, की केंद्र शासनाच्‍या वतीने विकसित भारत संकल्‍प यात्रा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम जिल्‍ह्यामध्‍ये तालुका, गावपातळीवरील लोकांना केंद्र व राज्‍य शासनाच्‍या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्‍यासाठी आयोजित करण्‍यात आला आहे.

या संकल्‍प यात्रेच्‍या माध्‍यमातून ग्रामीण भागातील सर्व घटकांतील लोकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्‍यात येत आहे. या उपक्रमात शासनाच्‍या योजनांच्‍या लाभांपासून जे लोक वंचित राहिले आहेत, त्‍यांना लाभ मिळवून देण्‍यासाठी गावागावांत जनजागृती करून समाजातील शेवटच्‍या घटकापर्यंत लोकांना लाभ मिळाला पाहिजे या दृष्‍टीने शासकीय अधिकारी व राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी समन्‍वय ठेऊन ही संकल्‍प यात्रा यशस्‍वी करावी, असे त्‍यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Petrol Pump Closure: बुलडाणा जिल्ह्यात निम्म्याहून अधिक पेट्रोल पंप बंद

Onion Prices Issues: बागलाण तहसीलमध्ये कांदा दरासाठी ठिय्या

Medical Shop Strike: औषध विक्रेत्यांचा आज संप

Jal Jeevan Mission: नळ पाणी योजनांच्या कामांना गती द्या : आमदार यड्रावकर

Underwater Tourism: सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनात ‘गुलदार’ची भर

SCROLL FOR NEXT