Bharat Sankalp Yatra : विकसित भारत संकल्प यात्रेत ४५ हजार ग्रामस्थांचा सहभाग

Development of India : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प’ यात्रा मोहिमेची जिल्ह्यात सुरुवात झाली
Bharat Sankalp Yatra
Bharat Sankalp YatraAgrowon
Published on
Updated on

Solapur News : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प’ यात्रा मोहिमेची जिल्ह्यात सुरुवात झाली असून, विकसित भारत संकल्प यात्रेला जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे.

जिल्ह्यातील ३९५ ग्रामपंचायतीत १७ डिसेंबर पर्यंत झालेल्या कार्यक्रमात जिल्ह्यातील ४५ हजार ४७० ग्रामस्थांनी सहभाग घेतला आहे. यावेळी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देखील देण्यात आला असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांनी दिली.

Bharat Sankalp Yatra
NABARD : नाबार्डकडून आर्थिक वर्षात होणार ४७१६ कोटींचा वित्त पुरवठा

शासनाच्या विविध योजनांचा लाभ ज्या लाभार्थ्यांना अद्यापही मिळालेला नाही त्यांच्यापर्यंत योजनांची माहिती ‘विकसित भारत संकल्प’ यात्रा या मोहिमेच्या माध्यमातून पोचविण्यात येत आहे. योजनांच्या लाभांपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास या यात्रेच्या माध्यमातून प्रोत्साहित करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील १ हजार २२ ग्रामपंचायतीमध्ये ९ व्हॅनच्या माध्यमातून नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ३९५ ग्रामपंचायतीमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचली आहे. या यात्रेदरम्यान ८ हजार ६९१ नागरिकांची आरोग्य विषयक तपासणी करण्यात आली.

Bharat Sankalp Yatra
Bharat Sankalp Yatra : विकसित भारत एक दिवा स्वप्नच!

यावेळी ६ हजार ५१५ नागरिकांनी क्षयरोग तपासणी व ३ हजार ९३९ नागरिकांची सिकलसेल चाचणी करण्यात आली. संबंधित गावात सुरक्षा विमा योजनेचा लाभ मिळविण्यासाठी १ हजार ४२२ आणि जीवन ज्योती विमा योजनेसाठी ६७६ नागरिकांनी अर्ज भरून दिले आहेत. तसेच १७८ नागरिकांना प्रधानमंत्री उज्वला योजनेचा लाभ देण्यात आला, असे सांगण्यात आले.

शेतकऱ्यांशी संवाद

शेतकऱ्यांसाठी ड्रोन प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येत आहे. या यात्रेद्वारे २७९ शेतकऱ्यांशी नैसर्गिक शेतीविषयी संवाद साधण्यात आला. ‘हर घर जल’ योजनेअंतर्गत १३६ जोडण्या देण्यात आल्या. या वेळी ३१ हजार १७५ नागरिकांनी विकसित भारतासाठी संकल्प घेतला. यात्रेदरम्यान ३ हजार ५५३ लाभार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com